समाजबांधवांच्या उपस्थितीने फुलले पाडळसे; चूल, पाटा-वरवंटा, बैलगाडी वेधताहेत लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 01:53 PM2018-02-04T13:53:02+5:302018-02-04T13:57:46+5:30
लेवा पाटील समाज राष्ट्रीय महाअधिवेश
नितीन झांबरे/ ऑनलाईन लोकमत
पाडळसे, जि. जळगाव, दि. 4 - लेवा पाटील समाजाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनानिमित्त यावल तालुक्यातील पाडळसे या गावी राज्यासह देशातील विविध भागातून हजारो समाज बांधवांनी हजेरी लावली असून यामुळे पाडळसे गाव व अधिवेशन स्थळ फुलून गेले आहे. दरम्यान, अधिवेशनस्थळी ठेवण्यात आलेले चूल, पाटा-वरवंटा तसेच बैलगाडीची प्रतिकृती लक्ष वेधून घेत आहे.
भोरगाव लेवा पंचायतीच्यावतीने पाडळसे येथे आयोजित लेवा पाटील समाजाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनानिमित्त देशभरातून समाजबांधवांनी येथे हजेरी लावली आहे.
वाहनतळ फुल्ल
अधिवेशनानिमित्त वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने वाहने लावण्यात आली असून संपूर्ण वाहन तळ फुल्ल झाले आहे. या सोबतच भुसावळ-रावेर मार्गावर पाडळसे येथे दुतर्फा दुचाकी लागलेल्या आहेत.
महिला, तरुण-तरुणींची लक्षणीय उपस्थिती
अधिवेशनस्थळी महिलांसह तरुण-तरुणींची लक्षणीय उपस्थिती आहे. बहुतांश तरुणी फेटा बांधून सहभागी झाल्या आहेत.