जळगावात स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेपासून हजारो विद्यार्थी वंचित
By Admin | Published: April 30, 2017 01:54 PM2017-04-30T13:54:15+5:302017-04-30T13:54:15+5:30
पाच मिनीटे उशीर झाल्याने परीक्षार्थीना काढले केंद्राबाहेर. विद्याथ्र्यानी व्यक्त केला संताप
जळगाव,दि.30- स्टाप सिलेक्शन कमीशनकडून (एस.एस.सी) रविवारी जळगाव शहरातील विविध केंद्रांवर मल्टी टास्टींग कर्मचारी या पदासाठी परीक्षा घेण्यात आली. मात्र अनेक विद्याथ्र्याना परीक्षा केंद्रात काही मिनीटे उशीर झाल्याने परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. तसेच विद्याथ्र्याना केंद्राच्या बाहेर काढण्यात आले.यामुळे परीक्षेपासून एक हजारहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींना वंचित रहावे लागले. प्रशासनाच्या या निर्णयामुळे अनेक विद्याथ्र्यानी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली आहे.
स्टाप सिलेक्शन कमीशनकडून रविवारी शहरातील 14 परीक्षाकेंद्रावर मल्टी टास्टींग कर्मचारी या पदासाठी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेची वेळ 10 ते 12 अशी देण्यात आली होती. तर रिपोर्टीगसाठी 9.30 ची वेळ देण्यात आली होती. परीक्षेला जिल्ह्यातून विद्यार्थी-विद्यार्थिनी आले असल्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रावर 9.40 वाजता पोहचले. मात्र अशा विद्याथ्र्याना परीक्षेला बसू देण्यात आले नाही. विद्याथ्र्याकडून विनविण्या केल्यानंतर देखील विद्याथ्र्याना परीक्षाकेंद्राबाहेर काढण्यात आले. मात्र त्यानंतरही परीक्षेला बसू न दिल्याने अनेक विद्यार्थिनींना अश्रु अनावर झालेले होते.