‘कोरोना’चा परिणाम, खान्देशातील हजारो पर्यटकांनी परदेशवारीचे तिकीट केले रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 12:17 PM2020-03-13T12:17:29+5:302020-03-13T12:18:07+5:30
देशांतर्गत पर्यटनाच्या तारखा पुढे ढकल्या
जळगाव : गेल्या महिनाभरापासून जगभरात ‘कोरोना’ने हाहाकार केल्यामुळे याचा पर्यटनावरही मोठा परिणाम झाला आहे. खान्देशातून पर्यटनासाठी थायलंड, सिंगापूरला जाणाऱ्या दीड हजारो पर्यटकांनी तिकीट रद्द केले आहे तर शिमला, दार्जिलिंगला जाणाºया पर्यटकांनी आपल्या पर्यटनाचे नियोजन पुढे ढकलले आहेत.
चीनहून कोरोना या विषाणूच्या प्रसाराला सुरुवात झाली असली तरी सद्यस्थितीत त्याचा जगभर फैलाव होत आहे. कोरोनामुळे चीनमधील लाखो भारतीय मायदेशी परतले आहे. इतकेच नव्हे तर त्याचा परिणामी देशी- विदेशी पर्यटनावर मोठा होत आहे. भारतातून दरवर्षी उन्हाळ््यात थायलंड, सिंगापूर, मलेशिया इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिक पर्यटनासाठी जात असतात. त्यानुसार यंदाही खान्देशातील हजारो पर्यटकांनी परदेशात जाण्यासाठी तिकीट बुकींग केले होते. मात्र, कोरोनामुळे पर्यटकांना विदेशातील पर्यटनाचा प्रवास रद्द करावा लागत आहे.
पंधरा दिवसांपासून सर्व व्यवहार टप्प
पर्यटन कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले की, करोनाच्या भीतीमुळे बहुतांश नागरिकांनी विदेशातील पर्यटनाचे तिकीट रद्द केल्यामुळे, आमचा उन्हाळ्यातील हंगाम पूर्ण ठप्प झाला आहे. उन्हाळ््यातच पर्यटन कंपन्यांसह विमान कंपन्या व हॉटेल व्यावसायिकांना खºया अर्थाने व्यावसायाची संधी असते. मात्र, कोरोनामुळे पंधरा दिवसांपासून अनेकांनी तिकीट रद्द केल्यामुळे, मोठा फटका बसल्याचेही पर्यटन व्यावसायिकांनी सांगितले. विशेषत: यामुळे पर्यटन कंपन्यांमध्ये काम करणाºया कर्मचाऱ्यांमध्येही बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्याचे सांगण्यात आले.
खान्देशातील दीड हजारांहून नागरिकांनी तिकीट केले रद्द
शहरातील विविध आंतरराष्ट्रीय पर्यटन कंपनीच्या प्रतिनिधींनी ‘लोकमत’ला सांगितले की, जळगाव, धुळे व नंदुरबार या ठिकाणाहून दरवर्षी हजारो पर्यटक विदेशात फिरण्यासाठी जातात. त्यानुसार यदांही दिवाळीपूर्वीचं अनेक नागरिकांनी पर्यटनाचे नियोजन करुन, तिकीट बुकींग केले होते. या पर्यटकांना विमान प्रवासाच्या तारखादेखील देण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून या पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणावर तिकीट रद्द करण्यात येत आहे. खान्देशातील जवळपास दीड हजारांहून नागरिकांनी विविध देशांचे तिकीट रद्द केले असल्याचे पर्यटन कंपन्यांतर्फे सांगण्यात आले. तसेच अनेक नागरिकांनी शिमला, दार्जिलींग, राजस्थान, गोवा या ठिकाणी जाणाºया पर्यटकांनी मार्च-एप्रिलमधील पर्यटनाच्या तारखा रद्द करुन मे व जूनमधील तारखा निवडल्या असल्याचेही पर्यटन कंपन्यांतर्फे सांगण्यात आले.
जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून विदेशात फिरायला जाणाºया आतापर्यंत एक हजाराहून अधिक जणांनी तिकीटे रद्द केली आहेत. भारतातील पर्यटनाच्या तारखेतही बदल करीत आहेत. यामुळे आमच्या पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. -सचिन पाटील, पर्यटन व्यावसायिक.
सिंगापूर, दुबई, युरोप आदी ठिकाणी उन्हाळ््याच्या सुट्टीनिमित्त पर्यटकांनी बुकींग केलेले तिकीट गेल्या आठवडाभरापासून कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर रद्द करण्यात येत आहे. यामुळे यंदाच्या उन्हाळ््यात आमचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प होत आहे. तसेच विदेशातूनही पर्यटनाकरिता भारतात येणाºयांचे प्रमाण कमी झाल्याने पर्यटन व्यावसायवर अवलंबून असणाºया नागरिकांवर बेरोजगारी ओढावत आहे.
-राहुल शर्मा, पर्यटन व्यावसायिक