‘ग्रामीण पेयजल’ने भागणार 15 गावांची तहान

By admin | Published: May 18, 2017 11:54 AM2017-05-18T11:54:11+5:302017-05-18T11:54:11+5:30

अमळनेर तालुक्यात 4, चोपडा तालुक्यातील 8 व पारोळा तालुक्यातील 3 गावांना पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत.

Threat of 15 villages to run through 'rural drinking water' | ‘ग्रामीण पेयजल’ने भागणार 15 गावांची तहान

‘ग्रामीण पेयजल’ने भागणार 15 गावांची तहान

Next

ऑनलाइन लोकमत

अमळनेर, जि. जळगाव, दि. 18 -ग्रामीण भागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत अमळनेर तालुक्यात 4, चोपडा तालुक्यातील 8 व पारोळा तालुक्यातील 3 गावांना पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत.
अमळनेर तालुक्यातील डांगर येथे सुमारे 14 ते 15 वर्षापासून उन्हाळ्यात दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे डांगर या गावासाठी सहा कि.मी.अंतरावरील पारोळा तालुक्यातील पिंपळकोठा, भोलाणे येथील इंदासी धरणाच्या जवळील विहिरीवरुन जलवाहिनी टाकून 97.99 लाखाची कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना तयार करण्यात येणार आहे. दोधवद येथे 56.95 लाखाची तापी नदीवरुन योजना मंजूर झाली आहे. तापी नदीचे पाणी सरळ घेतल्यास गाळ येवू शकतो, क्षार येवू शकतात. म्हणून पाण्याची टाकी न घेता फिल्टर प्लॅण्टची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणेकर यांची मंजुरी घेवून नव्याने 15 मे रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला. सारबेटे येथे 52.02 लाख किंमतीची चिखली नदी काठावरील विहिरीतून तर जुनोने येथे नाल्याजवळील विहिरीतून  61.62 लाखाची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे.
चोपडा तालुक्यातील भवाळे, गलंगी, गणपूर, गोरगावले खुर्द, कृष्णापूर, माचले, मजरेहिंगोणे, सत्रासेन या आठ गावांना तर पारोळा तालुक्यातील मंगरुळ, रताळे, तामसवाडी या गावांना मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत.

Web Title: Threat of 15 villages to run through 'rural drinking water'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.