खबरदार ! पुढे आला तर जीवानिशी मारु.., जळगावात चोरटय़ांची गुरख्याला धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:13 PM2017-11-15T12:13:04+5:302017-11-15T12:14:22+5:30
दुकान फोडले
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 15 - गोलाणी मार्केटमध्ये मोबाईल दुरुस्तीचे दुकान फोडताना चोरटय़ांना प्रतिकार करण्यासाठी गेलेल्या गुरख्याला चोरटय़ांनी खबरदार..पुढे आला तर तुला जीवानिशी मारु अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या गुराख्याने तत्काळ शहर पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलीस पोहचण्याच्या आत चोरटय़ांनी एका दुकानातून दहा हजार रुपयांची रोकड लांबवून पळ काढला. ही थरारक घटना सोमवारी मध्यरात्री दोन वाजता घडली.
ललित कृष्ण बहादूर (वय 32 रा. रेल्वे स्टेशन परिसर, मुळ रा.नेपाळ) हा तरुण गोलाणी परिसरात गस्त घालतो. सोमवारी रात्री दोन वाजता तायडे गल्लीच्या समोरील गोलाणी मार्केटमध्ये अचानक शटर उघडण्याचा आवाज आला. पुढे तीन जण शटर उघडताना दिसले. त्याने हटकले असता त्याला चोरांनी धमकावले.
चोरटय़ांनी धमकी दिल्यामुळे त्यांच्याजवळ शस्त्र असावेत या भीतीने गुराख्याने तत्काळ फोनवरुन शहर पोलीस स्टेशनला कळविले. त्याच वेळी दुसरे दुकानदार पूनम परदेशी हे लगA समारंभाचा कार्यक्रम आटोपून परत येत असताना दिसल्याने गुराख्याने त्यांना थांबविले. शेख अनिस शेख चाँद यांच्या दुकानातून ही रक्कम चोरटय़ांनी लांबविली.