vidhan sabha 2019 : साडे तीन हजार उपद्रवी व गुन्हेगार जिल्ह्याबाहेर काढणार - पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 12:59 PM2019-09-26T12:59:25+5:302019-09-26T12:59:38+5:30

जिल्ह्यातील ३६ संवेदनशील केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

Three and a half nuisance and criminals will be removed out of district | vidhan sabha 2019 : साडे तीन हजार उपद्रवी व गुन्हेगार जिल्ह्याबाहेर काढणार - पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले

vidhan sabha 2019 : साडे तीन हजार उपद्रवी व गुन्हेगार जिल्ह्याबाहेर काढणार - पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले

googlenewsNext

सुनील पाटील 
जळगाव : विधानसभा निर्भयपणे व शांततेत पार पडावी यासाठी उपद्रवी ठरलेले तसेच रेकॉर्डवर असलेल्या एकूणसाडे तीन हजार जणांना जिल्ह्याबाहेर काढले जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
जिल्ह्यात ११ मतदारसंघासाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर पोलीस दलाने आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यात ३६ मतदान केंद्र संवेदनशील असून त्यात सर्वाधिक ११ केंद्र भुसावळ शहरात आहेत.या सर्व केंद्रावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले असून तेथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासह अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात येणार आहे. गणेशोत्सवाप्रमाणे यावेळी देखील ‘रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स’ मागविण्यात आला आहे.
एकूण ८ हजारउपद्रवी गुन्हेगार राहणार बाहेर
निवडणूक काळात साडे तीन हजार उपद्रवी व गुन्हेगार जिल्ह्याबाहेर असतील तसेच याआधी लोकसभा व गणेशोत्सव काळात साडे चार हजार उपद्रवींना जिल्ह्याबाहेर काढण्यात आले असून त्यांना बंधपत्रात घेण्यात आले आहे.
आधीच्या गुन्हेगारांची मुदत डिसेंबरपर्यंत आहे, त्यामुळे एकूण आठ हजार गुन्हेगार जिल्ह्याच्या बाहेर असतील, अशी माहिती त्यांनी दिली.
सात ठिकाणी नवीन सिमा तपासणी नाके
इतर जिल्हा व राज्यातून जिल्ह्यात प्रवेश होणाऱ्या सात प्रमुख मार्गावर सिमा तपासणी नाके कार्यान्वित करण्यात आले आहेत. मध्य प्रदेश व गुजरातकडून येणाºया मार्गांवर अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात येणार असून प्रत्येक वाहनांचे व्हीडीओचित्रण केले जाणार आहे. या सिमा तपासणी नाक्यावर पोलीस, राज्य उत्पादन शुल्क व आरटीओ असे संयुक्त पथक राहणार आहे. बनावट दारु व अवैध मार्गाने येणाºया पैशावर विशेष नजर असेल.
साडे चार हजार अतिरिक्त कुमक
निवडणुकीसाठी जिल्ह्यातील साडे तीन हजार पोलिसांव्यतिरिक्त बाहेरुन साडे चार हजार पोलीस कर्मचारी मागविण्यात आले आहेत. त्यात एसआरपीएफ, रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स, आरसीपी प्लाटून, स्ट्रायकिंग फोर्स, क्युआरटी व होमगार्ड यांचा समावेश राहणार आहे. निवडणूक निरीक्षकांसोबत लवकरच सिमा तपासणी नाके व संवेदनशील केंद्राची पाहणी करण्यात येणार असल्याचे तेम्हणाले.
संवेदनशील केंद्र व सिमा तपासणी नाके निश्चित करण्यात आले आहे. बाहेरुन अतिरिक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक मागविण्यात आले आहे. ही निवडणूक शांततेत व निर्भयपणे पार पडावी यासाठी जनतेने सहकार्य करावे व अफवांबाबत तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.
- डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक

Web Title: Three and a half nuisance and criminals will be removed out of district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव