साडे तीन वर्षाचे बाळ घरी ठेवत दिली पाड्या व वस्तीवर सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:16 AM2021-01-03T04:16:45+5:302021-01-03T04:16:45+5:30

आनंद सुरवाडे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : माझे साडेतीन वर्षाचे बाळ जळगावात होते. त्यावेळी साक्री तालुक्यातील शेलबारी उपकेंद्रात नियुक्ती ...

A three-and-a-half-year-old baby was kept at home and given services in the villages and settlements | साडे तीन वर्षाचे बाळ घरी ठेवत दिली पाड्या व वस्तीवर सेवा

साडे तीन वर्षाचे बाळ घरी ठेवत दिली पाड्या व वस्तीवर सेवा

Next

आनंद सुरवाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : माझे साडेतीन वर्षाचे बाळ जळगावात होते. त्यावेळी साक्री तालुक्यातील शेलबारी उपकेंद्रात नियुक्ती झाली होती. सुरूवातीचा काळ कठीण होता... मात्र, पाड्यावरील रहिवाशांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्यात मिसळून, त्यांनाच कुटुंब मानत उत्तम आरोग्य सेवा देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि चौदा वर्षाच्या आरोग्य सेवेचे फळ म्हणून या पुरस्कारासाठी माझी निवड झाली, अशा भावना राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाईटिंगेल पुरस्कार प्राप्त आरोग्य सेविका प्रेमलता संजय पाटील यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना व्यक्त केल्या आहेत. लोकमतने घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांचा कार्यकाळ मांडला.

प्रश्न : आदिवासी भागात सेवा देतानाचे अनुभव कसे होते?

प्रेमलता पाटील : सुकापूर आरोग्य केंद्रांअंतर्गत शेलबारी उपकेंद्रात पहिलीच नियुक्ती मिळाली. त्या ठिकाणची परिस्थिती पाहून मी या ठिकाणी काम करू शकणार नाही, घरी परतेल असेच सर्वांना वाट होते. मात्र, दोनच महिन्यात मी या सहा पाड्यांवरील रहिवाशांची बोलीभाषा अवगत केली. त्यांच्यात पूर्ण मिसळले त्यांना समजून घेतले आणि आरोग्य सेवांबाबत त्यांच्यात जागृती केली. सिकलसेलबाबत जागृती केली, आरोग्याचे सर्व कार्यक्रम या लोकांपर्यंत पोहचविले. बाळापासून दूर राहण्याच्या वेदना होत्याच मात्र, आदिवासी भागातील आरोग्य सेवेचे समाधानही तेवढेच होते. लोकांमध्ये जागृती महत्त्वाची ठरली.. एक वेळ मी पाड्यावरील बालकांसाठी खोबर्याचे तेल दिले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी सर्व महिलांनी ते तेल डोक्याला लावले होते. तेव्हा मला समजंले की या ठिकाणी जागृती खूप महत्त्वाची आहे.

प्रश्न : पुरस्कारासाठी निवड झाल्यानंतर काय भावना आहेत ?

प्रेमलता पाटील : २००६ पासून आरोग्य सेवेत कार्यरत आहे. यात तुम्हाला सेवाही करायची संधी मिळते, त्याचा मोबदलाही मिळतो. त्यामुळे काम करीत असताना पुरस्काराबाबत कधीच विचार केला नव्हता, कल्पनाही नव्हती. केवळ आपल्याला प्रामाणिक काम करायचे आहे ऐवढेच मनात होते. मात्र, यात कुटुंबाचे, सर्व वरिष्ठांचे, सर्व सहकार्यांचे अत्यंत उत्तम पाठबळ आणि सहकार्य मिळाले. जिल्हा परिषद जळगावमध्ये आल्यानंतर सर्वांनी प्रोत्साहन दिले आणि या मोठ्या पुरस्कारासाठी निवड झाली आणि आता आनंद द्विगुणीत झाला आहे.

प्रश्न : कुटुंब आणि सेवा यात कसा समन्वय साधला ?

प्रेमलता पाटील : माझी सेवा ही कुटुंबापासून लांब असल्याने माझ्या बाळापासून मी दूर होते. पतींसह सर्वच कुटुंबाचे मोठे पाठबळ मिळाले. मला एक मुलगी आहे.... दुसऱ्या अपत्याचा आम्ही सेवेमुळे विचार केलाच नाही. साक्री तालुक्यातील सेवेनंतर सहा वर्ष मी रावेर तालुक्यातील चिनावल आरोग्य केंद्रात होते. या सर्वच ठिकाणी कुटुंबांतील सर्व सदस्यांचे मोठे पाठबळ मला मिळत गेले आणि मी आरोग्य सेवा प्रामाणिकपणे बजावू शकले.

कोट

आरोग्य यंत्रणा आता अधिक सक्षम झाली आहे. अनेक अत्याधुनिक बदल झाले आहे. कोरोना काळात सर्वच आरोग्य कर्मचार्यांनी अगदी झोकून पूर्ण वेळ सेवा दिली आहे. तुम्ही प्रामाणिक काम केल्यास त्याचे फळ मिळतेच, मग ते क्षेत्र कुठलेही असो. - प्रेमलता पाटील, आरोग्य सेविका

Web Title: A three-and-a-half-year-old baby was kept at home and given services in the villages and settlements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.