लाचखोर ग्रामसेवक, महिला दुकान निरीक्षकासह तिघे अटकेत

By admin | Published: June 22, 2017 01:14 PM2017-06-22T13:14:37+5:302017-06-22T13:14:37+5:30

लाच लुचपत विभागाची एकाच दिवशी केलेली कारवाई

Three arrested along with Bachchor Gramsevak, Women's Shop Inspector | लाचखोर ग्रामसेवक, महिला दुकान निरीक्षकासह तिघे अटकेत

लाचखोर ग्रामसेवक, महिला दुकान निरीक्षकासह तिघे अटकेत

Next

 ऑनलाईन लोकमत 

शिरपूर,दि.22 - लाचलुचपत विभागाने सावेरचे ग्रामसेवक राहूल भिका रायसिंग यांना 2 हजाराची लाच घेताना तर दुकान निरीक्षक भारती विश्राम पावरा आणि खाजगी इसम  प्रदीप पाटील यांना एक हजाराची लाच घेतल्याप्रकरणी अटक केली आहे.
सावेर-गोदी ग्रामपंचायत अंतर्गत एका तक्रारदाराने ग्रामरोजगार सेवक म्हणून सप्टेंबर ते नोव्हेंबर 2016 दरम्यान महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमार्फत काम केले होत़े सदर कामाचे मानधन 17 हजार 394 व मागील कामाचे 7 हजार रूपये असे एकूण 24 हजार 394 एवढी रक्कम शासनाकडून ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांच्या बँक खात्यात जमा झाली़ सदर मानधनाचा चेक घेण्यासाठी तक्रारदार ग्रामसेवक रायसिंग यांच्याकडे गेलेत, मात्र त्यांनी दोन हजाराची लाच मागितली होती. 
दुस:या घटनेत शिरपुरातील रेडीमेड दुकानाचे स्थलांतर झाले होते. शॉप अॅक्ट लायसन्समध्ये व्यवसायाच्या पत्यातील बदल नोंदविणेसाठी दुकान मालकाकडून एक हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी खाजगी इसम (पंटर) प्रदीप पाटील व दुकान निरीक्षक कार्यालयातील दुकान निरीक्षक भारती  विश्राम पावरा यांना अटक करण्यात आली.

Web Title: Three arrested along with Bachchor Gramsevak, Women's Shop Inspector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.