३५ हजारांच्या बेकायदा मद्यासह तिघांना अटक
By admin | Published: April 2, 2017 11:36 PM2017-04-02T23:36:23+5:302017-04-02T23:36:23+5:30
राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील परमीटरूम व वाईन शॉपी बंद झाल्यानंतर महामार्गावरील ढाब्यांवर मद्याचा अनधिकृतरित्या साठा करण्यात आल्याची गुप्त माहिती
भुसावळ : राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील परमीटरूम व वाईन शॉपी बंद झाल्यानंतर महामार्गावरील ढाब्यांवर मद्याचा अनधिकृतरित्या साठा करण्यात आल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर भुसावळचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्वत: दुचाकीवरून धडक तीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४६ वरील तीन ढाब्यांवर कारवाई करीत हॉटेल मालकांना अटक केली तर सुमारे २५ हजारांचा बेकायदा मद्य साठा जप्त केल्याने शहरातील हॉटेल्स व ढाबे चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे़
दरम्यान, हॉटेल्समध्ये बेकायदा मद्य पिणाऱ्या तळीरामांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर स्वत: नीलोत्पल यांनी त्यांची चांगलीच झिंग उतरल्याने मद्यप्रेमींनी "यापुढे नाही ना साहेब" म्हणत गयावया केल्याने त्यांना तंबी दिल्यानंतर घरी रवाना करण्यात आले़
तीन ढाब्यांवर धडक कारवाई
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४६ वरील हॉटेल हनी हे विक्की उर्फ भागचंद रमेश बत्रा यांच्या हॉटेलमधून बिअरसह विदेशी मिळून सहा हजार ४०० रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले़
दुसरी कारवाई हॉटेल खालसा पंजाबमध्ये करण्यात आली़ तेथून तीन हजार ७८० रुपयांचे देशीसह बिअर जप्त करण्यात आली़
तिसरी कारवाई अशपाक हिरा गवळी यांच्या चाहेल पंजाब ढाब्यावर करण्यात आली़ हा हॉटेलवरून २५ हजार ८० रुपयांचे देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली़ सर्वाधिक मद्य येथे पोलिसांना मिळून आले़
कारवाईत यांचा सहभाग
सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह एएसआय दिलीप कोळी, प्रदीप पाटील, संकेत झांबरे, विशाल सपकाळे, सुनील शिंदे, राजेश काळे, शेख रियाज आदींच्या पथकाने ही कारवाई केली़
सहाय्यक अधीक्षक नीलोत्पल म्हणाले की, महामार्गावरील ढाब्यांवर यापुढे अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास कारवाई निश्चित केली जाईल़ उघड्यावर दारू पिणाऱ्यांविरुद्ध तसेच मद्य पिवून वाहन चालवणांविरुद्ध आम्ही गुन्हे दाखल करीत आहोत़