जळगावात निलंबित पोलीस कर्मचा-यासह तिघांकडे घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 09:39 PM2020-01-19T21:39:13+5:302020-01-19T21:42:34+5:30
नेहरु नगरात अनेक दिवसापासून बंद असलेल्या तीन घरांचे कुलुप तोडून चोरट्यांनी धुडगूस घातल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. पोलीस कर्मचारी प्रशांत प्रकाश पाटील यांच्यासह जिजाबराव रामकृष्ण पाटील व प्रकाश किसन सोनवणे यांच्याकडे घरफोडी झाली आहे. कोणाच्याही घरात मौल्यवान वस्तू नसल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
जळगाव : नेहरु नगरात अनेक दिवसापासून बंद असलेल्या तीन घरांचे कुलुप तोडून चोरट्यांनी धुडगूस घातल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. पोलीस कर्मचारी प्रशांत प्रकाश पाटील यांच्यासह जिजाबराव रामकृष्ण पाटील व प्रकाश किसन सोनवणे यांच्याकडे घरफोडी झाली आहे. कोणाच्याही घरात मौल्यवान वस्तू नसल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
प्रशांत पाटील पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात आहे तर आई, वडील याच गुन्ह्यात फरार आहेत. त्यामुळे हे घर बंद आहे. जिजाबराव पाटील व प्रकाश सोनवणे हे पुण्यात मुलांकडे गेलेले आहेत. त्यामुळे दीड महिन्यापासून त्यांचेही घरे बंद होती. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार अतुल वंजारी व किशोर पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून तिन्ही घरांची पाहणी केली व घरमालकांशी संपर्क साधला. घरात कोणतीही मौल्यवान वस्तू नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले, मात्र पुण्यातून परत आल्यावर तक्रार देणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत.