जळगावात वीज तार तुटून तीन बसेस जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 05:22 PM2018-07-01T17:22:33+5:302018-07-01T17:25:39+5:30

उच्च दाब क्षमतेच्या मुख्य वीज वाहिनीच्या खालूनचे गेलेली दुसरी वीज वाहिनीची तार तुटून ती खासगी बसवर पडल्याने वीज प्रवाहाने आगी लागून एकापाठोपाठ तीन बसेस जळून खाक झाल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजता महामार्गावर दूरदर्शन टॉवरजवळ घडली.तीन्ही बसेसमध्ये वीज प्रवाह उतरल्याने आगीचे लोळ उठत होते.

Three buses burned in Jalgaon due to electricity wire | जळगावात वीज तार तुटून तीन बसेस जळून खाक

जळगावात वीज तार तुटून तीन बसेस जळून खाक

Next
ठळक मुद्देमहामार्गावरील घटना २५ लाखाचे नुकसानमहामार्ग झाला ठप्प

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१  : उच्च दाब क्षमतेच्या मुख्य वीज वाहिनीच्या खालूनचे गेलेली दुसरी वीज वाहिनीची तार तुटून ती खासगी बसवर पडल्याने वीज प्रवाहाने आगी लागून एकापाठोपाठ तीन बसेस जळून खाक झाल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजता महामार्गावर दूरदर्शन टॉवरजवळ घडली.तीन्ही बसेसमध्ये वीज प्रवाह उतरल्याने आगीचे लोळ उठत होते.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव येथील विलास एन.देशपांडे यांच्या मालकीचे नशिराबाद शिवारात महामार्गावर दूरदर्शन टॉवरच्या समोर जगदंबा मोटर रिपेअरींग नावाचे गॅरेज आहे. त्याशिवाय प्रसन्न ट्रॅव्हर्ल्स म्हणूनही त्यांचा व्यवसाय आहे. या ट्रॅव्हल्स कंपनीच्या दोन बसेस (क्र.एम.एच.४३ एच.२०१ व एम.एच.०४ जी.५४४६) या गॅरेजवर बाहेर लावण्यात आलेल्या होत्या. जैन इरिगेशन कंपनीचीही एक बस दुरुस्तीसाठी आलेली होती. या तिन्ही बसेल शेजारीच होत्या. रविवारी दुपारी एक वाजता बसेसच्या वरुन गेलेल्या वीज वाहिनीची तार अचानक तुटली व ती जैन कंपनीच्या बसवर पडली. क्षणातच धूर निघून या बसने पेट घेतला. सीट, टायर आदी जळून खाक झाले. त्यानंतर ही आग शेजारच्या दोन्ही बसला लागली. अचानक झालेल्या आगीने महामार्ग ठप्प झाला होता.

पाच बंबाद्वारे विझविली आग
आगीची माहिती मिळाल्यानंतर बसेसचे मालक विलास देशपांडे व त्यांचा मुलगा अभीजीत यांनी घटनास्थळ गाठून तातडीने मनपाच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधला. अर्धा तासाच दोन बंब दाखल झाले. त्यानंतर जैन कंपनीचाही बंब दाखल झाला. दरम्यान, फोनकरुनही बंब उशिरा आल्याचा आरोप देशपांडे यांनी केला. रविवारी महामार्गावर वाहतूक कमी होती, तरीही बंब उशिरा आले.वेळेवर बंब पोहचले असते तर कदाचित बसेसचे इतके नुकसान झाले नसते, असे देशपांडे यांचे म्हणणे आहे. या घटनेत २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या दोन्ही बसेस विना वापराच्या म्हणून या ठिकाणी लावण्यात आल्या होत्या. प्रासंगिक कराराने बसेस भाड्याने दिल्या जातात. स्वत:ची जागी असल्यानेच हा ठिकाणी लावण्यात आल्या होत्या.

Web Title: Three buses burned in Jalgaon due to electricity wire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.