अमळनेर येथे आचारसहींता भंग केल्याचे तीन गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 06:37 PM2019-04-23T18:37:09+5:302019-04-23T18:38:16+5:30
लोकप्रतिनिधी कायदा १९५१ नुसार कलम १२७ अ व भादवी १८८ प्रमाणे गुन्हा दाखल
अमळनेर : शहरात २०० मीटरच्या आत भाजपाचा बूथ लावल्याने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार केल्याने आचारसंहिता भंगाचे एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आचार संहिता प्रमुख अजय नष्टे, तहसीलदार ज्योती देवरे तसेच आर. एन. पाटील , के. टी. पाटील यांनी मतदान केंद्रांवर भेट दिली असता पंचायत समिती केंद्र १६६ वर मोहित विजय सोनवणे व मुकेश रमेश पारधी दोन्ही रा. स्टेशनरोड यांनी पंचायत समितीच्या आवारात १६६ क्रमांकाचा बूथ लाऊन ते मतदारांना चिठ्ठी वाटप करताना आढळून आले. त्यामुळे आचारसंहिता भंग केला. याबाबत अजय नष्टे यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोकप्रतिनिधी कायदा १९५१ नुसार कलम १२७ अ व भादवी १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच इंदिरा गांधी शाळेजवळ बूथ क्रमांक १८३ जवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचे नाव व फोटो असलेल्या चिठ्ठया बुथवर आढळून आल्याने चेतन नामदेव मिस्तरी, निलेश धनराज भोई व सागर महेंद्र बडगुजर रा. हनुमाननगर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचबरोबर पंचायत समिती जवळील बुथवर उमेश सतीश सोनार व पठाण काशीफखान इस्माईल दोही रा. जोशीपुरा यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव व चिन्ह असलेल्या चिठ्ठया मतदारांना वाटप केल्यामुळे त्यांच्यावरही आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.