सलग तीन दिवस भडगाव अंधारात
By Admin | Published: May 28, 2017 05:54 PM2017-05-28T17:54:07+5:302017-05-28T17:54:31+5:30
संतप्त नागरिकांचा वीज वितरण कंपनी कार्यालयावर मोर्चा
>ऑनलाईन लोकमत
भडगाव,दि.28 - शहरात 25 रोजी सायंकाळपासून वीजपुरवठा बंद आहे. तीन दिवस उलटूनही वीजपुरवठा पूर्णपणे सुरुळीत झाला नाही.यामुळे संतप्त नागरिकांनी 28 रोजी वीज सबस्टेशनवर मोर्चा काढला व वीज कंपनी अधिका:यांना जाब विचारला. घटनेची माहिती कळताच आमदार किशोर पाटील यांनीही सबस्टेशनला भेट दिली व अधिका:यांना धारेवर धरले. यानंतर दुरुस्ती कामाला शहरात दुपारी 12 वाजेनंतर वेगाने सुरुवात झाली.
25 रोजीच्या वादळ व पावसामुळे परिसरातील अनेक पोल वाकून वीज ताराही तुटल्या. यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. वीज जोडणीचे काम सुरु असल्याचे अधिकारी व कर्मचारी सांगत होते. तीन दिवस उलटूनही वीजपुरवठा सुरु न झाल्याने शहरातील वीज पुरवठा खंडीत होता. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. मोबाईल बंद पडले. इन्व्हर्टर, फ्रीजही बंद पडले. प्रचंड उकाडय़ामुळे नागरिक हैराण झाले होते.
28 रोजी वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने पुन्हा नागरिकांनी सकाळी 11 वाजता सबस्टेशनवर मोर्चा नेला. वीजपुरवठा सुरळीत करीत नाही तोर्पयत येथून हलणार नाही अशी भूमिका घेतली. आमदार किशोर पाटील यांना घटना कळताच त्यांनीही नागरिकांच्या मदतीसाठी धाव घेतली.