आजपासून शहरात तीन दिवस ‘जनता कर्फ्यू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 12:40 PM2020-05-15T12:40:33+5:302020-05-15T12:40:44+5:30

जळगाव : शहरात वाढत जाणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर १५ ते १७ मे दरम्यान शहरात ‘जनता कर्फ्यू’ पुकारण्यात आला आहे. ...

Three-day 'Janata Curfew' in the city from today | आजपासून शहरात तीन दिवस ‘जनता कर्फ्यू’

आजपासून शहरात तीन दिवस ‘जनता कर्फ्यू’

Next

जळगाव : शहरात वाढत जाणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर १५ ते १७ मे दरम्यान शहरात ‘जनता कर्फ्यू’ पुकारण्यात आला आहे. जिल्हा, मनपा प्रशासनासह शहरातील प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी तीन दिवस ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन केले आहे.

जळगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या पहिल्या लॉकडाउनमध्ये केवळ दोन होती. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. तर दुसरा रुग्ण बरा झाला होता. मात्र, दुसºया आणि तिसºया लॉकडाउनमध्ये शहरातील रु ग्णांची संख्या वाढत जात आहे. विशेष करून ३ मे पासून सुरू झालेल्या लॉकडाउनमध्ये ही संख्या ३० आहे. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे शहरातील रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कायम आहे. विशेष म्हणजे पहिल्या व दुसºया लॉकडाउनच्या तुलनेत रस्त्यावरील वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तुटावी व रुग्ण संख्येत घट व्हावी या उद्देशाने आता तीन दिवस ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन करण्यात आले आहे.

हॉकर्सला लगाम लावण्याची गरज
शहरात अनेक खासगी दुकानदारांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत आहेत. तर काही भाजीपाला विक्रेतही चांगल्याप्रकारे काळजी घेत आहेत. मात्र, शहरातील अनेक चौकांमध्ये अनेक अनधिकृत हॉक र्स आपले व्यवसाय थाटत आहेत. विशेष म्हणने मनपाने निश्चित करून दिलेल्या जागांवर व्यवसाय न करता रस्त्याचा कडेला किंवा एखाद्या कॉलनी, गल्लीत आपले व्यवसाय करत आहेत. त्यामुळे भाजीपाला खरेदीसाठी नागरिक देखील मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. त्यामुळे निदान तीन दिवसाच्या जनता कर्फ्यूत तरी हॉकर्सने शिस्त पाळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सोशल मिडीयावरही ‘जनता कर्फ्यू’चे फिरताहेत संदेश
जिल्हा, मनपा प्रशासनासह प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांनी ‘‘जनता कर्फ्यूचेआवाहन केले असले तरी नागरिक देखील सोशल मिडीयावरून संदेश पाठवून ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन करत आहेत. अनेक नागरिकांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप व फेसबूकचे डीपी देखील बदलवून त्यावर ‘जनता कर्फ्य’ूचे लोगोचे डीपी लावून घेतले आहेत.

दाणाबाजार आजपासून तीन दिवस पूर्णपणे बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असले तरी गर्दी कमी होत नसल्याने धान्य, कडधान्य, किराणा साहित्याची मुख्य बाजारपेठ असलेला दाणाबाजार १५ ते १७ मे दरम्यान तीन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय दाणाबाजार असोसिएशनने घेतला आहे. मुख्य बाजारपेठच बंद राहिल्यास कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होईल, असा विश्वास संघटनेतर्फे व्यक्त केला जात आहे. या तीन दिवस बाहेर गावाहून येणारा मालही बंद राहणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाउन दरम्यान जीवनावश्यक वस्तूंच्या दुकान वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय झाला. मात्र जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यापासूनच दाणाबाजारात मोठी गर्दी होत आहे. लॉकडाउनच्या धास्तीने अनेकांनी किराणा व इतर साहित्य खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी केली. सर्व साहित्य खरेदी झाले तरी या ठिकाणी अधिकचा साठा करण्यासाठी दररोज गर्दी वाढत राहिली. त्यात वर्षभराचे धान्य खरेदीसाठी पुन्हा झुंबड सुरू झाली. त्यानंतर दुकानांच्या वेळा निश्चित करण्यात आल्या, दुकानांवर खरेदीसाठी नियम घालून देण्यात आले. त्यात आता चार दिवसांपासून बॅरिकेटिंग करण्यात आले. तरीदेखील या ठिकाणची गर्दी ओसरत नसल्याचे चित्र आहे.
त्यात आता शहरात गेल्या तीन दिवसांपासून दररोज कोरोनाचे रुग्ण वेगवेगळ््या भागात आढळÞून येत आहेत. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी दाणाबाजार असोसिएशननेच पुढाकार घेऊन तीन दिवस दाणाबाजार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १५ ते १७ मे दरम्यान दाणाबाजारातील सर्व दुकान बंद राहणार आहेत. धान्य, कडधान्य, किराणा अशा १५०० चीज वस्तूंच्या २०० दुकान या ठिकाणीअसून याच बंद राहिल्यास नागरिकांची वर्दळ आपसूकच थांबेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Web Title: Three-day 'Janata Curfew' in the city from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.