पातोंडा येथे उद्यापासून तीन दिवसीय कीर्तन सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:17 AM2021-09-27T04:17:14+5:302021-09-27T04:17:14+5:30
पातोंडा, ता.अमळनेर : येथील श्री दत्त मंदिर चौकात दि. २८ ते ३० तीन दिवसीय कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले ...
पातोंडा, ता.अमळनेर : येथील श्री दत्त मंदिर चौकात दि. २८ ते ३० तीन दिवसीय कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा सप्ताह रमाबाई भिकन सुतार यांच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने आयोजित केला गेला आहे.
सप्ताहाच्या दरम्यान दि. २८ रोजी हभप राजेद्र महाराज पिंपळकोठेकर (आदिशक्ती मुक्ताई वारकरी शिक्षण संस्था पिंपळकोठा), दि. २९ रोजी हभप गोपालजी महाराज (दोनगावकर), दि. ३० रोजी हभप गुलाबमहाराज लोणकर यांचे रोज रात्री ८.३० ते १०.३० कीर्तन होईल. नित्यनेम रोज सकाळी ५ वाजता काकडा आरती व संध्याकाळी ५ वाजता हरीपाठ होईल. त्यांना हभप गुरुदत्त भजनी मंडळ व दक्षिणमुखी हनुमान मंडळ यांचे सहकार्य लाभणार आहे.
सर्व भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आयोजक हभप कल्पेश महाराज सुतार (पातोंडा) यांनी कळविले आहे.