जळगावात तीन दिवस जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:17 AM2021-03-10T04:17:27+5:302021-03-10T04:17:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव महापालिका हद्दीत शुक्रवार ते रविवार असा तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. ...

Three days public curfew in Jalgaon | जळगावात तीन दिवस जनता कर्फ्यू

जळगावात तीन दिवस जनता कर्फ्यू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जळगाव महापालिका हद्दीत शुक्रवार ते रविवार असा तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. ११ मार्च रोजी रात्री ८ वाजेपासून या कर्फ्युला सुरूवात होईल. तर १५ मार्च रोजी सकाळी ८ पर्यंत हा लागु राहणार असल्याची घोषणा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे व्यापारी, नागरिक तसेच इतर घटकांशी केलेल्या चर्चेतून तीन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात येत आहे. हा कर्फ्यू फक्त जळगाव महापालिका हद्दीपुरताच राहणार आहे. याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी देखील चर्चा करण्यात आली आल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी राऊत यांनी पुढे सांगितले की, १४ मार्च रोजी एमपीएससीची परीक्षा आहे. तसेच या काळात काही महाविद्यालयांमध्ये पुर्व नियोजित परीक्षा देखील आहेत. त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. अशाच पद्धतीने या कर्फ्युचे नियोजन करण्यात आले आहे. या परिक्षांना आणि जिल्ह्यातील सर्व परिक्षार्थींना परवानगी देण्यात आली आहे.’

हा कर्फ्यू फक्त तीनच दिवस आहे. त्यामुळे या काळात कुणीही साठेबाजी करु नये. सोमवारी सकाळी पुर्ववत व्यवहार सुरू होतील. त्यामुळे खरेदीसाठी कोणतीही गर्दी करू नये, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी उपस्थित होते.

नियमांचे पालन न केल्यास कारवाई - डॉ. प्रवीण मुंढे

जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या कर्फ्यूत जे नियम लावण्यात आले आहेत. त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी ही पोलिसांवर आहे. त्या नियमांचे उल्लंघन केल्यास संबधितांवर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे विनाकारण कुणीही फिरु नये, तसेच हा कर्फ्यू पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी केले आहे.

काय राहणार सुरू

रेल्वे, बस, विमान सेवा,

रिक्षा फक्त अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी, तसेच शासकीय, औद्योगिक अस्थापना कर्मचारी यांची वाहने व परिक्षेला जाणारे विद्यार्थ्यांसाठी (केवळ १-२)

दुचाकी वाहने फक्त अत्यावश्यक सेवेसाठी, तसेच शासकीय, औद्योगिक अस्थापना कर्मचारी यांची वाहने व परिक्षेला जाणारे विद्यार्थ्यांसाठी (केवळ १-१)

मेडिकल स्टोअर्स

हॉस्पिटल

दुध खरेदी-विक्री केंद्रे

कृषी संबधित कामे, कृषी सेवा केंद्रे, पशु खाद्य केंद्रे, पशुवैद्यकीय सेवा

औद्योगिक आस्थापना

पुर्व नियोजित परीक्षा आहेत,अशी शाळा, महाविद्यालये

शासकीय कार्यालये (५० टक्के उपस्थिती)

बँका, वित्तीय संस्था, पोस्टल सेवा

पेट्रोल पंप (अत्यावश्यक सेवेसाठी)

कुरीअर

गॅरेज, वर्कशॉप्स

माल वाहतुक

कोविड १९ लसीकरण कार्यक्रम

काय राहणार बंद

शैक्षणिक संस्था

हॉटेल, रेस्टॉरंट (फक्त डिलिव्हरी, पार्सल वगळता)

किरकोळ भाजीपाला, फळे खरेदी विक्री

धार्मिक स्थळे

शासकीय व खासगी बांधकामे

शॉपिंग मॉल्स, मार्केट

किराणा दुकाने

दारु दुकाने

स्पा, सलुन

खासगी कार्यालये

गार्डन पार्क, बगिचे

सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरणतलाव

क्रीडा स्पर्धा, प्रेक्षक गृह

पानटपरी, हातगाड्या, खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने

प्रदर्शने, मेळावे, संमेलन

आठवडी बाजार

सांस्कृतिक कार्यक्रम,

Web Title: Three days public curfew in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.