वेगवेगळ्या घटनेत रेल्वेखाली तिघांचा मृत्यू

By admin | Published: June 29, 2017 07:36 PM2017-06-29T19:36:22+5:302017-06-29T19:36:22+5:30

वेगवेगळ्या घटनेत रेल्वेखाली तिघांचा मृत्यू झाला.

Three deaths under the train in different incidents | वेगवेगळ्या घटनेत रेल्वेखाली तिघांचा मृत्यू

वेगवेगळ्या घटनेत रेल्वेखाली तिघांचा मृत्यू

Next

ऑनलाइन लोकमत
चाळीसगाव/ पाचोरा (जि. जळगाव), दि. 29 - वेगवेगळ्या घटनेत रेल्वेखाली तिघांचा मृत्यू झाला. चाळीसगाव येथे दोन तर गाळण जवळ एक अशा या तीन घटना घडल्या. चाळीसगाव-रेल्वे स्टेशन जवळील खंबा क्रमांक ३२५/२६-२८ दरम्यान दिलीप रामदास पाटील (वय ५०, रा.शाहूनगर चाळीसगाव) यांचा रेल्वे इंजिनसमोरच सापडून मृत्यू झाला. ही घटना २९ रोजी १० वाजेपूर्वी घडली. याबाबत रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. तपास हेकाँ सोनवणे करीत आहेत. दुसऱ्या घटनेत खंबा क्रमांक ३२७ दरम्यान भुसावळ-मुंबई पॅसेंजर गाडीतून पडून राजेंद्र भाऊसाहेब पाटील (वय४५) रा. संजय गांधी नगर चाळीसगाव यांचा मृत्यू झाला. ते हॉटेल मनोरमाचे ते व्यवस्थापक होते. रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून तपास हेकाँ भावसार करीत आहेत. धावत्या महाराष्ट्र एक्सप्रेस मधून पडून विद्यार्थ्यांचा करूण अंत झाल्याची घटना पाचोरा तालुक्यातील बाळद-गाळण दरम्यान घडली. राहुल दिलीप सोनवणे (वय १७) रा. उत्राण, ता. एरंडोल हा ११ वीतील विद्यार्थी पुण्याहून पाचोऱ्याकडे महाराष्ट्र एक्सप्रेस ने येत असताना बाळद शिवारातील रेल्वेहद्दीत धावत्या रेल्वेतून खाली पडला व जागीच मरण पावला. ही घटना २९ रोजी सकाळी ८ वाजेचे सुमारास घडली , राहुल याच्या वडिलांचे ७ महिण्यापूर्वीच निधन झाले असून घरची परीस्थिती हलाखीची आहे. या घटनेमुळे विधवा आई, लहान भाऊ व आजी यांनी एकाच टाहो फोडला. राहुल शिक्षनासाठी पुणे येथे जाणार होता, अपघाताबाबत झेलम एक्सप्रेसच्या चालकाने खबर दिल्यानग पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. पाचोरा ग्रामीण रुग्णालयत शव विच्छेदन करण्यात आले. उत्राण पं. स. सदस्य अनिल पाटील यांनी कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Three deaths under the train in different incidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.