अमळनेरात पुन्हा डेंग्यूचे तीन रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:13 AM2021-07-21T04:13:39+5:302021-07-21T04:13:39+5:30

अमळनेर : शहरात बालाजी पुरा व इतर ठिकाणी डेंग्यूचे आणखी तीन रुग्ण आढळून आल्याने तसेच बालकांमध्ये डायरिया आणि ...

Three dengue patients were again found in Amalner | अमळनेरात पुन्हा डेंग्यूचे तीन रुग्ण आढळले

अमळनेरात पुन्हा डेंग्यूचे तीन रुग्ण आढळले

Next

अमळनेर : शहरात बालाजी पुरा व इतर ठिकाणी डेंग्यूचे आणखी तीन रुग्ण आढळून आल्याने तसेच बालकांमध्ये डायरिया आणि टायफाईडचे १५ टक्के रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

बालरोग तज्ज्ञ डॉ. नितीन पाटील यांच्याकडे दिव्यांका प्रदीप महाजन आणि अनुष्का प्रशांत महाजन या दोन बालकांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले तर आणखी दोन बालकांना डेंग्यूसदृश्य आजाराची लागण झाली होती. मात्र त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन यांनी तातडीने आरोग्य सेविका व आशा वर्कर्स याना आदेश देऊन बालाजी पुरा भागाचा सर्व्हे केला.

आरोग्य सेवक किशोर माळी, आशा सोनार, प्रतिभा साळवा, मंदा, रेखा सोनवणे, अंजली माळी, विद्या पाटील, भाग्यश्री जोगी, एएनएम मनीषा, आरती, वंदना यांनी १५७ घरांच्या ६०४ लोकसंख्या असलेल्या भागातील ४८० कंटेनर तपासले. त्यात फ्रीज, कूलर, पाण्याचे भांडे, ड्रम, घराच्या छतावरील टाक्या, रस्त्यावरील डबके, हौद आदी तपासले असता ११ ठिकाणी डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या.

सर्व कंटेनर खाली करून इतर ठिकाणी औषधी फवारण्यात आली. नगरध्यक्षा पुष्पलता पाटील व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या आदेशाने पालिकेचे आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे यांनी बालाजी पुरा भागात साफसफाई करून रस्त्यावरील डबके, पाण्याचे साठे, गटारींमध्ये औषध व पावडर फवारणी केली.

डेंग्यूसोबत टायफाईड व डायरियाचीदेखील लागण होत आहे. त्यामुळे मुलांना पाणी उकळून द्यावे, स्वच्छता ठेवावी, पाणी उघड्यावर साठवून ठेवू नये. गटारीत, डबक्यात औषधी टाकावी.

- डॉ. जी. एम. पाटील, बालरोग तज्ज्ञ, ग्रामीण रुग्णालय अमळनेर.

नगरपालिकेने संपूर्ण शहरात डास व कीटकनाशक फवारणी करावी. पावसाळ्यामुळे ठिकठिकाणी चिखल व डबकी साचत आहेत. नियमित सफाई करावी.

- व्ही. एस. चव्हाण, नागरिक, अमळनेर.

200721\20jal_13_20072021_12.jpg~200721\20jal_14_20072021_12.jpg

आरोग्य विभागातर्फे साफसफाई करून औषध फवारणी करताना तसेच कंटेनर तपासणी करताना. (छाया : अंबिका फोटो)~आरोग्य विभागातर्फे साफसफाई करून औषध फवारणी करताना तसेच कंटेनर तपासणी करताना. (छाया : अंबिका फोटो)

Web Title: Three dengue patients were again found in Amalner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.