महाजनांसह वसाकाचे तीन संचालक भाजपत जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 08:03 PM2019-09-23T20:03:31+5:302019-09-23T20:05:10+5:30
धुळ्यात आज सोहळा : इतर पदाधिकारीही सोबत
न्हावी, ता. यावल / फैजपूर : कॉँग्रेस नेते, माजी मंत्री जे. टी. महाजन यांचे पुत्र व मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन यांनी कॉँग्रेस सदस्यत्वाचा व जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत मंगळवारी धुळे येथे भाजपा प्रवेशाचे संकेत दिले आहेत. या संदर्भातील चर्चेस त्यांनी दुजोरा दिला आहे.
शरद महाजन हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या चार दिवसांपासून होती. महाजन यांनीही कार्यकर्त्यांच्या इच्छेचे कारण सांगून लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल असे सांगितले होते. त्यांच्या या भूमिकेने कॉँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली होती
जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत धुळे येथे प्रवेश सोहळा
मंगळवारी धुळे येथे भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनराथराव खडसे आदी नेत्यांच्या उपस्थितीत शरद महाजन यांनी भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी त्यांच्यासोबत न्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंच भारती नितीन चौधरी, उपसरपंच सतीश जंगले तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन प्रितेश पाटील, व्हाईस चेअरमन सुधाकर चौधरी तसेच सर्व संचालक व सर्व सदस्य, याचबरोबर फ्रुट सेल सोसायटीचे सर्व सदस्य, न्हावी शिक्षक प्रसारक मंडळाचे चेअरमन मिलिंद महाजन तसेच संचालक मंडळाचे सदस्य, न्हावी दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन नितीन चौधरी, व्हाईस चेअरमन पराग वाघुळदे तसेच सर्व संचालक व म .सा. का .व्हाईस चेअरमन भागवत पाटील, संचालक नरेंद्र नारखेडे तसेच काही संचालक भाजपत प्रवेश करणार आहेत.
भाजपात प्रवेशाचा निर्णय झाला आहे. कार्यकर्त्यांची इच्छा होती. कॉँग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदाचा तसेच सदस्य पदाचा आपण राजीनामा दिला आहे.
- शरद महाजन, मसाका चेअमन.