जळगावात व्यापाऱ्याची तीन लाखात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:16 PM2018-08-18T12:16:52+5:302018-08-18T12:19:13+5:30

एमआयडीसी पोलिसात गुन्हा

Three gross traders in Jalgaon fraud | जळगावात व्यापाऱ्याची तीन लाखात फसवणूक

जळगावात व्यापाऱ्याची तीन लाखात फसवणूक

Next
ठळक मुद्देव्यापारी व दलाल सांगून चणादाळ चुनी खरेदी ३ लाख ४ हजार रूपयांची फसवणूक

जळगाव : औद्योगीक वसाहतीमधील निक्की अ‍ॅग्रो प्रॉडक्ट या कंपनीमधून २८ एप्रिल २०१८ रोजी राहुल मेहता व कल्पेश शर्मा (दोन्ही रा़ अकोला) यांनी व्यापारी व दलाल असल्याचे सांगून चणादाळ चुनी खरेदी केली़ मात्र या खरेदी केलेल्या चूनीचा धनादेश न वटल्याने मालकाने पैशांची मागणी करून सुध्दा त्यांनी पैसे न दिल्याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात शुक्रवारी दोघांविरूध्द मोहन रघुनाथ नेरकर यांच्या फिर्यादीवरून ३ लाख ४ हजार रूपयांची फसवणुक केल्याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
औद्योगीक वसाहतीमधील निक्की अ‍ॅग्रो प्रॉडक्ट प्रा. लिमिटेड दाळ कंपनी असून आहे. या ठिकाणी मोहन नेरकर हे मॅनेजर म्हणून कामाला आहेत़ २८ एप्रिल रोजी अकोला येथील दलाल कल्पेश शर्मा, व्यापारी राहुल मेहता हे दोघं निक्की कंपनीत येऊन आम्हाला अकोला येथील पारस मिलसाठी २१ टन चुनी हवी आहे असे सांगितले़ त्यानंतर नेरकर यांनी संपूर्ण व्यवहार ठरविल्यानंतर ३ लाख ४ हजार ७१० रुपये किंमतीची चनादाळ चुनी खरेदी केली.
यानंतर नेरकर यांनी ठरल्याप्रमाणे २१ टन चूनी ही पारस मिल याठिकाणी पाठविली़ त्यानंतर शर्मा व मेहता यांनी ३ लाख ४ हजार ७१० रुपये किंमतीचा धनादेश दिला. परंतू हा धनादेश न वटल्याने पैसे मिळाले नाही़
धनादेश न वटल्याने नेरकर यांनी शर्मा व मेहता यांना संपर्क करून पैशांची मागणी करून देखील पैसे दिले नाही. उलट आम्ही मालच खरेदी केला नसल्याचे उत्तर त्यांनी दिले़ अखेर याबाबत मोहन नेरकर यांच्या फियार्दीवरून शुक्रवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.
या घटनेबाबतचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सह्यायक पोलिस निरीक्षक समाधान पाटील व भरत लिंगायत करीत आहे.

Web Title: Three gross traders in Jalgaon fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.