महामार्ग चौपदरीकरणासाठी मुदत वाढवूनही तीनच निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:41 AM2019-03-15T11:41:32+5:302019-03-15T11:42:05+5:30
‘नही’ च्या अधिकाऱ्यांची माहिती
जळगाव : शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्ग क्र.६ च्या चौपदरीकरणासाठी ३ ई-निविदा प्राप्त झाल्या असल्याची माहिती ‘नही’च्या सूत्रांनी दिली.
शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्ग क्र.६ (नवीन क्रमांक ५३) च्या समांतर रस्ते व चौपदरीकरण कामाच्या पहिल्या टप्प्यात चौपदरीकरणाच्या काढलेल्या निविदेची मुदत सातत्याने वाढविण्यात येत होती.
पाचव्यांदा ही मुदत १३ मार्चपर्यंत वाढविण्यात आली होती. त्यामुळे या निविदेसाठी तब्बल ८० दिवसांचा कालावधी गेला.
तीन निविदा प्राप्त
सातत्याने निविदेसाठी मुदतवाढ दिल्याने या कामासाठी निविदा येतात की फेरनिविदा काढावी लागते? अशी शंका निर्माण झाली होती. मात्र या कामासाठी ३ इ-निविदा प्राप्त झाल्या असल्याची माहिती ‘नही’च्या सूत्रांनी दिली.
मंजुरी नंतर घेणार निवडणूक आयोगाची परवानगी
या निविदांची आता तांत्रिक छाननी होणार आहे. निविदेतील तांत्रिक मुद्दे बरोबर असल्यास आर्थिक निकषात त्या बरोबर आहेत की नाहीत? याची तपासणी करून त्यातील दरानुसार कमी दराची निविदा मंजुरीसाठी ‘नही’च्या मुख्यालयाकडे तपासणीसाठी पाठविली जाईल. ही मंजुरी मिळाल्यानंतर कार्यादेश देण्यापूर्वी निवडणूक आयोगाची परवानगी घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. या सर्व प्रक्रियेसाठी किमान १५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली.