भडगावात एकाच कुटुंबात तीन जणांची सामूहिक आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 06:28 PM2019-03-30T18:28:10+5:302019-03-30T18:29:31+5:30

मुलाच्या विरहात टोकाचे पाऊन

 Three homosexual suicides in one family in Bhadga | भडगावात एकाच कुटुंबात तीन जणांची सामूहिक आत्महत्या

भडगावात एकाच कुटुंबात तीन जणांची सामूहिक आत्महत्या

Next

भडगाव, जि.जळगाव : मुलगा सय्यद इसम बब्बू याच्या विरहात एकाच कुटुंबातील तीन जणांनी आत्महत्या केल्याची घटना भडगाव शहरातील टोणगाव भागात शनिवारी सकाळी उघडकीस आली. बब्बू लल्लन सय्यद (वय ४८), बब्बू यांची पत्नी पिंकी (वय ३८) व मुलगी स्नेहा (१५ वय) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.
गेल्या आठवड्यात नऊ वर्षीय बालक सयद इसम सय्यद बब्बू याचा निर्घृण खून करून त्याचा मृतदेह पाचोरा रोडवरील रजनी देशमुख महाविद्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या केळीच्या शेतात सापडला होता. पोलिसांचा तपास सुरू असतानाच त्याचे वडील, आई व बहीण यांनी घरात साण्याच्या लोखंडी रॉडला दोर बांधून सामूहिक आत्महत्या केली. यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील तीन जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याने समाजमन सुन्न झाले आहे. अशी ही येथील पहिलीच घटना आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नेहमीप्रमाणे सय्यद परिवार शनिवारी पहाटे पाचला उठला. बब्बू सय्यद याने सकाळी घराच्या बाजूला मशिदीत ५.३० वाजता नमाज पठण केले. यानंतर घरात गेल्यावर दरवाजाची आतील कडी लावून आत्महत्या केली. बराच वेळ उलटल्याने ही घटना उघडकीस आली. यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत अगोदर दरवाजाचा कडीकोंडा तोडला. तेव्हा बब्बू यांची पत्नी पिंकी व मुलगी स्नेहा या तिघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.
घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी भडगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलीस उपविभागीय अधिकारी नजीर शेख, पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र जाधव, पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे व पोलीस कर्मचारी आदींनी माहिती जाणून घेतली. जळगाव येथून श्वानपथकास पाचारण करण्यात आले होते. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला इलियास बेग मुराद बेग मिर्झा रा.भडगाव यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ही आत्महत्या की घातपात याबाबत शहरात चर्चा होत आहे. दरम्यान, या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मात्र या घटनेचे कारण समजू शकले नाही.
 

Web Title:  Three homosexual suicides in one family in Bhadga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव