पष्टाणे उपसरपंच निवडीवरून धरणगाव तहसील कार्यालयात तीन तास ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 11:12 PM2019-01-03T23:12:55+5:302019-01-03T23:13:21+5:30
सुदर्शना पाटील यांची निवड रद्द करण्याची मागणी
धरणगाव : तालुक्यातील पष्टाणे बु.येथे झालेल्या उपसरपंच निवडी प्रसंगी निवडणूक अधिकाऱ्यांनी कुठलेही नियम न समजाविता सदस्यांची दिशाभूल करुन दोन वेळा सरपंचांना मतदानाचा अधिकार देवून एका गटाचा उपसरपंच चुकीच्या पध्दतीने निवड केल्याचा आरोप करुन दूसºया गटाच्या सदस्यांसह ५० ग्रामस्थांनी संध्याकाळी ६ ते रात्री ९ वाजे पर्यत तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. तहसिलदार सी.आर.राजपूत यांना निवेदन देवून ही निवडणूक रद्द करण्याची मागणी केली.
पष्टाणे ता.धरणगाव येथे ३ रोजी उपसरपंच निवड प्रक्रीया झाली. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सत्यपाल डी.पाटील हे होते. निर्णय अधिकाºयांंना सदस्य निलेश पाटील यांनी निवडणूकीचे नियम समजावून सांगण्याची मागणी केली असता त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. यावेळी सुदर्शना संजय पाटील विरुध्द सुनिल भाऊलाल पाटील यांनी उमेदवारी दाखल केली होती. यावेळी सदस्यांसोबत विद्यमान सरपंच प्रकाश सोनवणे यांनी मतदान केल्याने दोघां उमेदवारांना समसमान ४/४ मते मिळाले. त्यामुळे पुन्हा दुसºयांदा सरपंच सोनवणे यांनी निर्णायक मतदान सुदर्शना पाटील यांच्या बाजूने केल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सुदर्शना पाटील यांना विजयी घोषीत केले. मात्र ही निवड चूकीची असून असल्याचा आरोप पराभूत उमेदवार सुनिल पाटील, नीलेश पाटील, दिपाली पाटील, सुनिता पाटील या सदस्यांसह ग्रामस्थांनी केला आहे. ही निवडणूक रद्द करावी या मागणीसाठी त्यांनी तीन तास तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.