आगीत तीन घरे झाली बेचिराख

By admin | Published: January 19, 2016 01:02 AM2016-01-19T01:02:17+5:302016-01-19T01:02:17+5:30

नंदुरबार : शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत तीन घरे बेचिराख झाल्याची घटना नंदुरबारातील साक्री रस्त्यावरील कोहिनूर चित्र मंदिरासमोर घडली.

Three houses were burnt to the fire | आगीत तीन घरे झाली बेचिराख

आगीत तीन घरे झाली बेचिराख

Next

नंदुरबार : शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत तीन घरे बेचिराख झाल्याची घटना नंदुरबारातील साक्री रस्त्यावरील कोहिनूर चित्र मंदिरासमोर घडली. पालिकेचे पाण्याचे बंब नेहमीप्रमाणे उशिराने आल्याने नागरिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला. याप्रकरणी शहर पोलिसात अगिAउपद्रवान्वये नोंद करण्यात आली आहे.Aउपद्रवान्वये नोंद करण्यात आली आहे.

जळकाबाजार ते साक्रीनाका दरम्यान असलेल्या कोहिनूर चित्र मंदिरासमोरील वस्तीत ही घटना दुपारी 12 वाजता घडली. क्षणार्धात तीन घरांमधील संसारोपयोगी सामान बेचिराख झाल्याने तीन कुटुंब उघडय़ावर आले आहेत. या भागात राहणारे शब्बीर पठाण (बग्गीवाले) यांचे कच्चे दोन मजली घर आहे. दुपारी 12 वाजेच्या सुमारास घरातील विजेच्या वायरींमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने दुस:या मजल्यावरील घरातून धूर येऊ लागला. ही बाब शेजारच्या लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पठाण यांना सांगितले. घर लाकडी असल्यामुळे लागलीच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा घरातून निघू लागल्या. त्यामुळे परिसरातील जनता भयभीत झाली. परिसरात बहुतेक घरे ही कच्ची अर्थात लाकडी आणि कौलारू आहेत. त्यामुळे आग आणखी भडकणार नाही याची काळजी घेण्यासाठी आणि ज्या घराला आग लागली त्या घरातील संसारोपयोगी वस्तू वाचविण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला. लागलीच मदत कार्य सुरू झाले. योगायोगाने या भागातून सोनार समाजाच्या धार्मिक विधिअंतर्गत मिरवणूक निघालेली होती. त्यातील पाण्याचे टँकरसुद्धा संबंधित कुटुंबाने लागलीच उपलब्ध करून दिले. त्यामुळे बादल्या आणि मिळेल त्या साधनांद्वारे टँकरमधून पाणी आणून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू झाला.

परंतु आगीच्या ज्वाला मोठय़ा असल्यामुळे विझविण्यासाठी मर्यादा येत होत्या. अखेर दुस:या मजल्यावरील पत्रे काढून त्यातून पाणी टाकण्याचा प्रयत्न झाला. तरीही उपयोग होत नव्हता. त्यामुळे लगतची तिन्ही घरे आगीत खाक झाली.

सोनारखुंट ते साक्रीनाका आणि तेथून थेट शासकीय कार्यालयांमध्ये जाण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर रहदारी असते. आजच्या घटनेच्या वेळीदेखील रहदारी मोठय़ा प्रमाणावर खोळंबली होती. शिवाय बघ्यांनीदेखील गर्दी केली होती. त्यामुळे आग विझविण्यासाठी कसरत करावी लागत होती. शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर बघ्यांना पांगविण्यात आले. शिवाय रहदारी मच्छीबाजार व धोशातकीयामार्गे वळविण्यात आली.

दुपारी महसूल विभागातर्फे नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. शासनातर्फे मदत मिळविण्यात यावी यासाठी तातडीने प्रयत्न करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अगि

Web Title: Three houses were burnt to the fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.