अमळनेर तालुक्यात तलावात बुडून दोन युवक मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 08:55 PM2019-09-08T20:55:20+5:302019-09-08T20:55:52+5:30

१३ वर्षीय मुलीचा विषबाधेने मृत्यू

Three killed in Amalner taluka | अमळनेर तालुक्यात तलावात बुडून दोन युवक मृत्युमुखी

अमळनेर तालुक्यात तलावात बुडून दोन युवक मृत्युमुखी

Next





अमळनेर : तालुक्यात रविवार हा घातवार ठरला असून दोघा तरुणांचा पाण्यात बुडून तर एका अल्पवयीन मुलीचा विषारी पदार्थ सेवनाने मृत्यू झाला.
पोहताना पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू
तालुक्यातील पळासदळे येथील हेमंत संजय पाटील (वय २२) हा परिसरातील चिखली नदीच्या बंधा?्यावर दुपारी दीड वाजेच्या सुमारास पोहण्यासाठी गेला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
हेमंत हा नौदलात भरती होण्यासाठी प्रयत्न करीत होता. त्यासाठीच सरावाचा भाग म्हणून तो पोहत होता. गावात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवाजी साहेबराव पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास भरत ईशी करीत आहेत.
विसर्जन करताना तलावात तरुणाला जलसमाधी
प्रताप महाविद्यालयाचा विद्यार्थी अंकित चतुर पाटील (वय २२) हा गणपती विसर्जनासाठी धार येथील पाझर तलावात गेला असता त्याचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना दुपारी अडीचच्या सुमारास घडली. प्रताप महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या गणपती विसर्जनासाठी धार तलावावर पाण्यात जात असताना तेथील ग्रामस्थांनी त्याला हटकले. मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. पुढे गाळ असल्यामुळे तो त्यात फसला. त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अंकित हा कुरखेडी (ता. शिरपूर) येथील रहिवासी होता. तो प्रताप महाविद्यालयात बी.एस्सीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्या अकाली मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. मुख्य रेक्टर विद्यार्थ्यांसोबत नसल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपस सुनील हटकर करीत आहेत. शून्य नंबरने हा गुन्हा मारवड पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात येणार आहे.
जवखेडा येथील प्रीती लक्ष्मण पाटील (वय १३) मूळ रा.बाळद, ता.भडगाव हिचा विषारी औषध सेवन केल्याने मृत्यू झाला.
प्रीती घरात असताना तिने विषारी औषध सेवन केले. शेजारी राहणा?्या प्रकाश पाटील यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस पाटील उल्हास लांडगे यांना कळविले. त्यावेळी तिच्या तोंडातून फेस येत असल्याने दीपक पाटील, नगराज पाटील गिरधर पाटील यांच्या मदतीने तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी प्रकाश ताडे यांनी तिला मृत घोषित केले. पोलीस पाटील उल्हास लांडगे यांच्या खबरीवरून अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस नाईक प्रशांत वाडीले करीत आहेत.

Web Title: Three killed in Amalner taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.