तीन वेगवेगळ््या अपघातात तिघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:30 AM2019-03-15T00:30:09+5:302019-03-15T00:30:40+5:30
तीन जण जखमी
जळगाव : जिल्ह्यात तीन वेगवेगळ््या ठिकाणी झालेल्या अपघातात तीन जण ठार तर तीन जण जखमी झाला.
चोपडा येथे शहराच्या गावाबाहेरील धरणगाव चौफुलीवर गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास निमगव्हाणकडे बर्फ घेऊन जाणाऱ्या रिक्षाला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॉलाने (क्रमांक सी.जी.०४ जे डी ३८९५) जोरदार धडक दिली. यात जोरदार आवाज होऊन मालवाहू रिक्षा रस्ताच्या कडेला फेकली जाऊन रिक्षात बसलेला मजूर भूपेंद्रसिंग लेखराम बाथम (१८) हा तरुण जागीच ठार झाला. त्याच्या सोबत गाडीत बसलेला पंकज अजयपाल कश्यप हा तरुण गंभीर जखमी झाला आहे तर अन्य दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर ट्रॉला चालकाने शिरपूरकडे पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी पाठलाग करून शिरपूर बायपास रोडवर पकडून चालकास ताब्यात घेतले. या प्रकरणी मालवाहू रिक्षाचालक जगदीश कोळी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला ट्राला चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रदीप राजपूत करीत आहेत.
वाहनातून फेकले गेल्याने चोपड्याचा तरुण ठार
चोपडा- वैजापूर रस्त्यावर तेल्या घाटात वळणावर खासगी प्रवासी वाहतूक करणाºया चारचाकी वाहनातून (एम.एच.१५, के.३००८) फेकल्या गेल्याने चालकाच्या मागे बसलेला चोपडा येथील साने गुरुजी वसाहतीतील रहिवासी पिंटू चिंतामन भोई (३८) हे ठार झाले. वैजापूर येथून मासेमारी व्यवसाय करून पिंटू भोई हे परत येत असताना हा अपघात घडला. जखमी अवस्थेत पिंटू भोई यांना चोपडा येथे खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना जळगाव येथे नेण्याचा सल्ला दिला. तेथे उपचार सुरु असताना पिंटू भोई यांचा मृत्यू झाला. सुनील सीताराम भोई यांच्या फिर्यादीवरून चालक संतोष शंकर पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सासरी आलेला तरुण अपघातात ठार
चाळीसगाव - मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात बंडू बाबुलाल गायकवाड (वय ३३, रा.पातोंडा ता.चाळीसगाव) हा मजूर जागीच ठार झाला. हा अपघात १४ रोजी पहाटे ५.३० वाजता धुळे रोडवरील हनुमान मंदिरासमोर घडली. मयत बंडू हा चाळीसगाव येथील आनंदवाडीत सासरवाडीला मुक्कामी आला होता. घटना घडताच वाहन चालकाने वाहन सोडून पळ काढला. वाल्मीक गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक आशिष रोही तपास करीत आहेत.