भिंत अंगावर पडल्याने तीन मजूर ठार; एक जखमी, तिघे मजूर उत्तर प्रदेशातील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 05:47 PM2023-03-20T17:47:45+5:302023-03-20T17:48:42+5:30

नाला-खोदाईचे काम करीत असताना पाठीमागे असलेली भिंत अचानक अंगावर कोसळली.

Three laborers killed as wall collapses; One injured, three laborers from Uttar Pradesh | भिंत अंगावर पडल्याने तीन मजूर ठार; एक जखमी, तिघे मजूर उत्तर प्रदेशातील

भिंत अंगावर पडल्याने तीन मजूर ठार; एक जखमी, तिघे मजूर उत्तर प्रदेशातील

googlenewsNext

संजय सोनार

चाळीसगाव- नाला-खोदाईचे काम करीत असताना पाठीमागे असलेली भिंत अचानक अंगावर कोसळली. यात तीन मजूर जागीच ठार झाले. तर एकजण जखमी झाला. ही घटना औरंगाबाद रस्त्यावरील सूर्य छाप जर्दा या तंबाखू कंपनीत रविवारी रात्री घडली. ठार झालेले मजूर उत्तर प्रदेशातील रहिवासी होते.

जखमी मजुराला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, एच. एच. पटेल या तंबाखू कंपनीत रविवारी रात्री नाला सफाईचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक कम्पाऊंडची भिंत कोसळली.

या भिंतीखाली दाबले गेल्याने तीन मजूर जागीच ठार झाले. ठार झालेल्या मजुरांमध्ये मोहंमद अली फकीर अली (४७), विनीत कुमार (३५) व लतीफ रहिम बक्ष (३६) यांचा समावेश आहे. जमुनाप्रसाद चौरसिया हा मजूर जखमी झाला आहे. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. याबाबत रविवारी रात्री उशिरा शहर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Three laborers killed as wall collapses; One injured, three laborers from Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.