जळगावातून परभणी जिल्ह्यातील सराफाचे सव्वा तीन लाखाचे दागिने लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 04:28 PM2017-12-06T16:28:22+5:302017-12-06T16:35:21+5:30
बसस्थानकातील शौचालयात शौचासाठी गेलेल्या कपिल सुधाकर वुदावंत (वय ३८, रा.मानवत, जि.परभणी) येथील या सराफाचे सव्वा तीन लाख रुपयांचे सोन्याच्या दागिन्यावर तेथील विजय जहांगीर तडवी (वय ३८ रा.हरिविठ्ठल नगर, जळगाव) या कामगारानेच हात साफ केल्याची घटना उघडकीस आली आहे.तडवी याला बुधवारी जिल्हा पेठ पोलिसांनी दागिन्यासह अटक केली आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,६: बसस्थानकातील शौचालयात शौचासाठी गेलेल्या कपिल सुधाकर वुदावंत (वय ३८, रा.मानवत, जि.परभणी) येथील या सराफाचे सव्वा तीन लाख रुपयांचे सोन्याच्या दागिन्यावर तेथील विजय जहांगीर तडवी (वय ३८ रा.हरिविठ्ठल नगर, जळगाव) या कामगारानेच हात साफ केल्याची घटना उघडकीस आली आहे.तडवी याला बुधवारी जिल्हा पेठ पोलिसांनी दागिन्यासह अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कपिल वुदावंत यांचे मानवत येथे कृष्णा ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानासाठी लागणारे दागिने घेण्यासाठी ते नेहमीच जळगावला येतात. त्यानुसार मंगळवारीही दुपारी दोन वाजता ते जळगावात आले. सराफ बाजारातील नवलखा ज्वेलर्स येथून बांगड्या, नेकलेस, पैंडण, कानातील आयरींग, डोरले व कुडलु असे ३ लाख २२ हजार ५०० रुपये किमतीचे १०७ ग्रॅम सोन्याचे दागिने घेतले. बॅगमध्ये हे दागिने ठेवल्यानंतर घरी परत जाण्यासाठी ते सायंकाळी सहा वाजता बसस्थानकात आले.
बसस्थानकात आल्यानंतर वुदावंत हे शौचास जाण्यासाठी बसस्थानकातील शौचालयात गेले. तेथील कांउटरवरील कर्मचाºयाजवळ बॅग ठेवून ते शौचास गेले, तेथून परत आल्यानंतर जागेवर तो कर्मचारी व बॅगही नव्हती. त्यामुळे वुदावंत घाबरले. त्यांनी अन्य लोकांकडे चौकशी केली असता त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, त्यामुळे त्यांनी सरळ जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठले. पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना त्यांनी घडलेली घटना कथन केली. गायकवाड यांनी वुदावंत यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करुन तत्काळ पथक तपासासाठी रवाना केले. या पथकाने रात्रीतूनच तडवीचा शोध घेऊन त्याला अटक केली.