जळगावात आणखी तीन कोरोना बाधित रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 04:48 PM2020-04-25T16:48:58+5:302020-04-25T16:49:54+5:30
कोविड रुग्णालयात २१ एप्रिल रोजी कोरोना संशयित व्यक्तींचे स्वॅब घेतलेल्यांपैकी तीन रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. या तीनही रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
जळगाव : येथील कोविड रुग्णालयात २१ एप्रिल रोजी कोरोना संशयित व्यक्तींचे स्वॅब घेतलेल्यांपैकी तीन रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. या तीनही रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
या तीन रुग्णांमध्ये मलकापूर, जि.बुलढाणा येथील ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे, तर भुसावळ येथील ४३ वर्षीय महिला व अमळनेर येथील ४३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या १४ इतकी झाली आहे. यापैकी एक रुग्ण बरा होऊन घरी गेला आहे, तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित १० रुग्ण कोरोना संसर्ग कक्षात उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांनी दिली.