जळगाव जिल्ह्यात आणखी तीन कोरोना बाधित रूग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 07:31 PM2020-05-09T19:31:37+5:302020-05-09T19:33:38+5:30

कोरोना बाधित रूग्णांची संख्या झाली 160

Three more corona infected patients were found in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात आणखी तीन कोरोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आणखी तीन कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next

जळगाव - जिल्ह्यातील अमळनेर, पाचोरा, जळगाव येथे स्वॅब घेतलेल्या 48 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 45 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून *तीन* व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रूग्णांमध्ये अमळनेर येथील एक, जळगावातील दोन रूग्णांचा समावेश आहे. तसेच कोरोना बाधित रूग्णांपैकी आज अमळनेरच्या एक व भुसावळ येथील एक रूग्णाचा मृत्यू झाला आहे. निगेटिव्ह आढळलेले सर्व तपासणी अहवाल पाचोरा येथील आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या *160* इतकी झाली असून त्यापैकी वीस रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

Web Title: Three more corona infected patients were found in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.