जामनेर तालुक्यात तीन महिन्यात पाच खून, ‘क्राईम रेट’ वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 06:55 PM2019-03-29T18:55:59+5:302019-03-29T18:56:16+5:30

तीन महिलांचा समावेश

Three murders in three months, 'crime rate' increased in Jamner taluka | जामनेर तालुक्यात तीन महिन्यात पाच खून, ‘क्राईम रेट’ वाढला

जामनेर तालुक्यात तीन महिन्यात पाच खून, ‘क्राईम रेट’ वाढला

googlenewsNext

जामनेर : जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात जामनेर तालुक्यात पाच जणांचे खून झाले असून यात तीन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. चारीत्र्याच्या संशयावरुन दोघा महिलांना जीव गमवावा लागला. तालुक्यात ‘क्राईम रेट’ वाढत असून तो चिंताजनक असल्याचे तालुकावासीयांचे म्हणणे आहे.
जानेवारी महिन्यात जळगाव न्यायालयात कार्यरत असलेल्या अ‍ॅड. राखी उर्फ विद्या पाटील यांचा पती डॉ.भरत पाटील यांनी चारित्र्याच्या संशयावरुन खून केला.
त्यानंतर दुसऱ्याच महिन्यात ३ फेब्रुवारी रोजी येथील खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिका मनिषा कोळी यांचाही चारीत्र्याच्या संशयावरुन पती अनिल कोलीने खून केला होता. दोन आठवड्यांनी पुन्हा १७ फेब्रुवारी रोजी कासली येथील विधवा आशाबी साहेबू तडवी यांचा मालमत्तेच्या वादातून दीरानेच खून केला.
३ मार्च रोजी नेरी येथील संदीप पवार या तरुणाचा पत्नी कोमलने डोक्यात पेव्हर ब्लॉकने वार करुन निर्घूणपणे खून केला.
त्यानंतर आता पुन्हा वाकडी येथील विनोद चांदणे या ग्रा.पं.सदस्याचा राजकीय सुडाने खून झाला.

Web Title: Three murders in three months, 'crime rate' increased in Jamner taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव