व्यापाऱ्यांच्या राष्ट्रीय संघटनेची तीन पदे जळगावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:30 PM2019-05-19T12:30:17+5:302019-05-19T12:30:24+5:30
‘कैट’च्या राज्य सचिवपदी प्रवीण पगारिया, पुरुषोत्तम टावरी वरिष्ठ उपाध्यक्ष तर दिलीप गांधी उपाध्यक्षपदी
जळगाव : व्यापारी बांधवांच्या कॉन्फडरेशन आॅल इंडिया ट्रेडर्स (कैट) या देशपातळीवरील संघटनेची महत्त्वाची तीन पदे जळगावला मिळाली असून यामध्ये संघटनेच्या राज्य सचिवपदी प्रवीण पगारिया यांची निवड करण्यात आली आहे. या सोबतच राज्य वरिष्ठ उपाध्यक्षपदी पुरुषोत्तम टावरी तर उपाध्यक्षपदी दिलीप गांधी यांची निवड करण्यात आली आहे.
या संदर्भात शनिवारी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देण्यात आली. या वेळी हे तीनही पदाधिकारी उपस्थित होते. संघटनेची राज्य कार्यकारीणी नुकतीच घोषित करण्यात आली असून यामध्ये संघटनेच्या राज्याध्यक्षपदी हरेंद्र शाह (मुंबई) यांची निवड करण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले.
जकात विरोधी आंदोलन, स्थानिक संस्था कर (एलबीटी) हद्दपार करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या जळगावातील व्यापाऱ्यांच्या सक्रीय सहभागाची दखल घेत प्रथमच या संघटनेवर जळगावला स्थान देत एकाच वेळी तीन महत्त्वाची पदेदेखील जळगावला मिळाले आहे.
राष्ट्रीय पातळीवरील संघटनेचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाल्याने व्यापाºयांची बैठक घेऊन महत्त्वाचे प्रश्न या माध्यमातून लावून धरत ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.