दुचाकीच्या अपघात पहुरचे तीन भाविक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 03:29 PM2018-09-03T15:29:15+5:302018-09-03T15:30:41+5:30
वाकोद येथील जागृत देवस्थान असलेल्या चौण्डेश्वर महादेवाच्या दर्शनाला जात असताना झालेल्या अपघातात पहूर येथील तीन जण जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडे सहा वाजता वाडी गावाजवळील पुलाजवळ घडली.
वाकोद, ता. जामनेर : वाकोद येथील जागृत देवस्थान असलेल्या चौण्डेश्वर महादेवाच्या दर्शनाला जात असताना झालेल्या अपघातात पहूर येथील तीन जण जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडे सहा वाजता वाडी गावाजवळील पुलाजवळ घडली.
श्रावण सोमवार निमित्त शिवभक्तांची दर्शनासाठी याठिकाणी मोठी गर्दी होते. येथील देवस्थानाच्या दर्शना साठी पहुर येथून सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास संतोष सुकदेव जाधव (३६) हे पत्नी प्रमिला (३०), मुलगा हेमंत (८), मुलगी जयश्री (१३), विद्या (१०) एकूण पाच जण दुचाकी क्र.एम. एच. १९ बी. एन. ८४८१ ने पहुर कडून वाकोद गावी येत होते. या दरम्यान वाडी गावाजवळ असलेल्या पुलाजवळ कुत्रे भांडण करीत दुचाकी समोरा रस्त्यात आल्याने दुचाकीचा अपघात झाला. यात तीन जण जखमी झाले आहे. तर संतोष जाधव यांना डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
वाकोद चौण्डेश्वर महादेव मंदिरावर श्रावण मासात या ठिकाणी
जळगाव, औरंगाबाद , जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून नवस फेडण्यासाठी व दर्शना साठी असंख्य भाविक येथे येतात. येथे भक्ताची मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्रावण मासात येथे यात्रेचे स्वरूप आलेले असते.