एसटी कर्मचाऱ्याच्या मृत्यूप्रकरणी तीन जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 05:01 PM2018-12-06T17:01:16+5:302018-12-06T17:03:35+5:30

वाघुर धरणामध्ये पार्टी करण्यासाठी व पोहण्यासाठी गेलेल्या जळगाव येथील बस कर्मचाºयाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर, संशयित तीन आरोपींविरोधात भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला बुधवारी गुन्हा दाखल केलेला आहे.

Three people guilty of killing ST worker | एसटी कर्मचाऱ्याच्या मृत्यूप्रकरणी तीन जणांवर गुन्हा

एसटी कर्मचाऱ्याच्या मृत्यूप्रकरणी तीन जणांवर गुन्हा

Next
ठळक मुद्देभुसावळ तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखलतपासानंतर न्यायालयाला अहवाल देणार

जळगाव : वाघुर धरणामध्ये पार्टी करण्यासाठी व पोहण्यासाठी गेलेल्या जळगाव येथील बस कर्मचाºयाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर, संशयित तीन आरोपींविरोधात भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला बुधवारी गुन्हा दाखल केलेला आहे. मिलिंद उत्तम साळुंखे, विशाल नाना थोरात व प्रदीप वाघ असे या जळगाव आगारातील गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाºयांची नावे आहेत.
दोन महिन्यांपूर्वी ६ आॅक्टोंबरला सचिन नामदेव जयकारे (रा.दादावाडी, जळगाव ) हे एसटी कर्मचारी जळगाव आगारातीलच आपले मित्र उत्तम साळुंखे, विशाल नाना थोरात व प्रदीप वाघ यांच्यासोबत वाघुर धरणावर पार्टी व पोहणयसाठी गेले होेते. पार्टी करुन इतर तिघे साथीदार घराकडे परतले होते. मात्र, सचिन जयकारे घरी आले नव्हते. तर दुसºया दिवशी त्यांचा मृतदेह वाघुर पात्रात आढळुन आला होता. मयत सचिन यांचे भाऊ सुधीर जयकारे यांच्या फिर्यादीवरुन भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु, सुधीर यांनी खुनाचा दाखल करण्यात यावा. या मागणीसाठी न्यालयात याचिका केल्यावर, न्यालयाच्या आदेशानुसार भुसावळ तालुका पोलिसांनी संशयित आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. तपासाअंती न्यायालयात अहवाल सादर करणार आहेत.

पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पत्र महामंडळाकडे आलेली नाही. पत्र आल्यावर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखुन त्या कर्मचाºयांवर कारवाई करण्यात येईल.
-राजेंद्र देवरे, विभाग नियंत्रक, जळगाव

न्यायालयाच्या आदेशानुसार महामंडळाच्या त्या तिघे कर्मचाºयांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र, आदेशात अटक करण्याचे म्हटलेले नसल्याने, अटक करण्यात आलेली नाही. गुन्ह्याचा तपास करुन, न्यायालयात अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसार होईल.
-रामकृष्ण कुंभार, पोलीस निरीक्षक, भुसावळ तालुका पोलीस स्टेशन.

Web Title: Three people guilty of killing ST worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.