मोरेश्वर नगरात दंगल, तिघे जखमी

By admin | Published: April 12, 2017 12:35 AM2017-04-12T00:35:18+5:302017-04-12T00:35:18+5:30

आरडा-ओरड न करण्यावरून वाद : सहा जणांविरुद्ध गुन्हा

Three people injured in road accident in Moreshwar | मोरेश्वर नगरात दंगल, तिघे जखमी

मोरेश्वर नगरात दंगल, तिघे जखमी

Next

भुसावळ : घराजवळ शांतता राखा, आरडा-ओरड करू नका, असे सांगितल्याचा राग आल्याने शाब्दीक वाद विकोपाला जावून मोरेश्वर नगरात दंगल उसळली़ संशयीत आरोपींनी घरात शिरून दोघा भावांसह वयोवृद्धेला मारहाण करण्यात आली़ ही घटना १० रोजी दुपारी चार वाजता घडली़ या घटनेप्रकरणी शहर पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला़
शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरेश्वर नगरातील अनिल मारोती राखुंडे यांच्या घरासमोर संशयीत आरोपी आरडा-ओरड करीत असल्याने त्यांनी शांतता राखा, असे सांगितल्याचा आरोपींना राग आला़ त्यांनी बेकायदा राखुंडे यांच्या घरात प्रवेश करीत अनिल यांच्या चेहºयावर फायटर, लोखंडी पाईपने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली़ भांडण सोडवण्यासाठी फिर्यादीचा भाऊ व आई आल्यानंतर त्यांनाही संशयीत आरोपींनी मारहाण केल्याचा आरोप आहे़ तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल व पोलीस निरीक्षक वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय फारूक शेख करीत आहेत़
दुचाकी लांबवली
भुसावळ- पंढरीनाथ नगरातील विजय मधुकर किल्लेदार यांची मालकीची २० हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम़एच़१९ बीडी़९९३१) २८ रोजी चोरीस गेली़
या गुन्ह्याप्रकरणी तक्रारदार अनिल राखुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी पापाराम रायसिंग पंडीत, आकाश रुपसिंग पंडीत, आकाश रुपसिंग पडीत, गोलू रायसिंग पंडीत, तिलक चंदेले (सर्व रा़वाल्मीक नगर, भुसावळ) व २० ते २५ वयोगटातील काळ्या-सावळ्या रंगाचा अनोळखी तरुणाविरुद्ध गुरनं़२०/१७, भादंवि कलम १४१, १४३, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला़
२५ उपद्रवींना शहरबंदी
 महामानव डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहर व बाजारपेठ हद्दीतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या २५ जणांना प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी शहरबंदीचे आदेश काढले आहेत़ विविध गुन्ह्यांची पार्श्वभूमी असलेल्या उपद्रवींना १३ ते १५ दरम्यान शहरबंदी करण्यात आली़

Web Title: Three people injured in road accident in Moreshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.