जळगावात कारागृहाच्या प्रभारी अधीक्षकासह तीन जण निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:39 PM2018-10-21T12:39:25+5:302018-10-21T12:40:07+5:30

दसऱ्याला दांडी मारणे भोवले

Three people suspended in Jalgaon Jail Superintendent | जळगावात कारागृहाच्या प्रभारी अधीक्षकासह तीन जण निलंबित

जळगावात कारागृहाच्या प्रभारी अधीक्षकासह तीन जण निलंबित

Next

वरिष्ठ तुरुंगाधिका-यांचीही चौकशी
जळगाव : वरिष्ठांची परवानगी न घेता परस्पर कारागृहात दांडी मारल्याप्रकरणी कारागृहाचे प्रभारी अधीक्षक बी.डी.श्रीराव, कंपाऊंडर राजेश एखंडे व रक्षक नामदेव चव्हाण यांना उपमहानिरीक्षकांनी शनिवारी तडकाफडकी निलंबित केले. त्याशिवाय वरिष्ठ तुरुंगाधिकारी सुनील कुंवर यांचीही चौकशी सुरु असल्याची माहिती उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी ‘लोकमत’ ला दिली.
बंदीवानाची प्रकृती बिघडल्याने निर्माण झाली अडचण
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, प्रभारी अधीक्षक बी. डी. श्रीराव, कंपाऊंडर राजेश एखंडे व रक्षक नामदेव चव्हाण हे दसºयाच्या दिवशी विना परवानगी बाहेरगावी निघून गेले होते. त्यादिवशी कारागृहात एका बंदीवानाची प्रकृती बिघडली. त्याला शासकीय रुग्णालयात हलविण्यासाठी कारागृह अधीक्षकांची परवानगी आवश्यक होती. याबाबत कारागृहाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्याकडे तक्रार झाली होती. देसाई यांच्या पडताळणीत श्रीरावसह तिन्ही जण कारागृहात नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे श्रीराव यांच्याकडील पदभार तडकाफडकी काढून घेण्यात आला व त्यांच्या जागी नंदुरबार येथील वरिष्ठ तुरुंगाधिकारी अनिल वांदेकर यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला होता.
कुवर यांच्या चौकशीचा दुसरा टप्पा
कारागृहाचे वरिष्ठ तुरुंगाधिकार सुनील कुवर यांची पहिल्या टप्प्यात चौकशी पूर्ण झालेली आहे. आता चौकशीचा दुसरा टप्पा सुरु झालेला आहे. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर चौकशी अहवालात काय निष्पन्न होते, त्यानुसार कारवाईचा निर्णय घेतला जाणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. कुवर यांच्याबाबत एक तक्रार रक्षकाची तर काही तक्रारी प्रभारी अधीक्षक डी.बी.श्रीराव यांनीच केलेल्या आहेत.
विभागीय चौकशी सुरु
श्रीराव, एखंडे व चव्हाण या तिघांना निलंबित केल्यानंतर त्यांची विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, श्रीराव यांची मुळ नियुक्ती धुळे येथील आहे. वरिष्ठ तुरुंगाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती आहे. कारागृहाचे पद रिक्त असल्याने श्रीराव व त्याआधी कुवर यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला होता. दोन्ही प्रभारी अधिकाºयांची कारकिर्द वादग्रस्तच ठरली.
विनापरवानगी मुख्यालय सोडल्यामुळे श्रीराव यांच्यासह तिघांना निलंबित केले आहे. चौकशी होईपर्यंत ते निलंबित असतील. सुनील कुवर यांच्या चौकशीचा दुसरा टप्पा सुरु आहे. कारागृहात गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही.
- योगेश देसाई, उपमहानिरीक्षक, कारागृह औरंगाबाद

Web Title: Three people suspended in Jalgaon Jail Superintendent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.