जबरी लूट करणाऱ्या तिघांना जंगलातून घेतले ताब्यात; आसोदा येथे शस्त्र घेऊन दहशत माजविणारे जाळ्यात
By विजय.सैतवाल | Published: June 16, 2024 09:52 PM2024-06-16T21:52:06+5:302024-06-16T21:52:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शस्त्राचा धाक दाखवत वृद्धाजवळील दोन हजारांची रोकड जबरीने हिसकवून नेणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शस्त्राचा धाक दाखवत वृद्धाजवळील दोन हजारांची रोकड जबरीने हिसकवून नेणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने असोदा ते तरसोद रस्त्यावरील जंगलातून रविवार, १६ जून रोजी ताब्यात घेतले. यात वैभव विजय सपकाळे (१९), कल्पेश नीलेश इंगळे (१९) आणि दीपक धनराज सपकाळे (२० तिघे रा. आसोदा, ता. जळगाव) यांचा समावेश आहे. त्यांना तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
तालुक्यातील असोदा गावातील वाल्मीक अंकात बिऱ्हाडे (७२) यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडून दोन हजार रुपयांची रोकड जबरीने हिसकावून पसार झाले होते. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिघ संशयित असोदा ते तरसोद दरम्यान असलेल्या जंगलातील मंदिराजवळ लपून बसल्याची माहिती एलसबीच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पोहेकॉ राजेश मेढे, जितेंद्र पाटील, बबन पाटील, भारत पाटील यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यांनी रात्रभर शोधकार्य राबवून पहाटे मंदिराच्या परिसरात झोपलेल्या तिघांच्या मुसक्या आवळल्या.