प्रतापच्या तीन विद्यार्थिनी ठरल्या सुवर्णपदकाच्या मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:11 AM2021-07-05T04:11:43+5:302021-07-05T04:11:43+5:30
यात गणित विभागातील काजल नारायण मराठे या विद्यार्थिनीने बीएस्सीला ९५.७३ गुण मिळवून विद्यापीठात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे, तर ...
यात गणित विभागातील काजल नारायण मराठे या विद्यार्थिनीने बीएस्सीला ९५.७३ गुण मिळवून विद्यापीठात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे, तर सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विद्यार्थिनी राजकमल प्रवीण पाटील हिने एमएस्सी या वर्गाच्या परीक्षेत ८७.३५ टक्के गुण मिळवून विद्यापीठात ती प्रथम आली आहे. मराठी विभागातील एम.ए.च्या परीक्षेत ज्योत्स्ना राहुल कांबळे यांनी ९५.६० टक्के गुण मिळवून विद्यापीठात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. या तीनही सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींचे प्रताप महाविद्यालयाच्या वतीने खान्देश शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन नुकताच गौरव करण्यात आला आहे.
याप्रसंगी खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक नीरज अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्योत्स्ना कांबळे व काजल मराठे या गुणवंत विद्यार्थिनींनीही आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिल कदम, कार्याध्यक्ष जितेंद्र जैन, संचालक हरिभाऊ भिका वाणी, संचालक योगेश मुंदडे, डॉ. संदेश गुजराथी, नीरज अग्रवाल, प्रदीप अग्रवाल, चिटणीस डॉ. अरुण जैन, उपप्राचार्य डॉ. एम.एस. वाघ, उपप्राचार्य डॉ. जी.एच. निकुंभ, उपप्राचार्या डॉ. कल्पना पाटील, आईक्यूएसी समन्वयक डॉ. जयेश गुजराथी, गणित विभागप्रमुख डॉ. नलिनी पाटील, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. एस.ए. जोशी, मराठी विभागप्रमुख डॉ. रमेश माने, मराठी विभागातील प्रा. ज्ञानेश्वर कांबळे, प्रा. योगेश पाटील, प्रा. विलास गावित, प्रा. ज्ञानेश्वर खलाणे, गणित विभागातील डॉ. वंदना पाटील, प्रा. वैशाली पाटील, सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्रा. वैशाली महाजन, प्रा. हेमलता सूर्यवंशी, प्रा. दिशा पाटील, प्रा. पल्लवी बाविस्कर, महाविद्यालयाचे लेखापाल राकेश निळे, भटू चौधरी उपस्थित होता.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपप्राचार्या डॉ. कल्पना पाटील यांनी केले, तर आभार मराठी विभागप्रमुख डॉ. रमेश माने यांनी मानले.
040721\04jal_2_04072021_12.jpg
प्रतापच्या तीन विद्यार्थिनी ठरल्या सुवर्णपदकाच्या मानकरी