जिल्हा परिषदेतील तिघे क्वॉरंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 12:21 PM2020-05-13T12:21:24+5:302020-05-13T12:21:47+5:30

जळगाव : जिल्हा परिषदेत एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेत मंगळवारी अधिकाऱ्यांची तपासणी करण्यात आली. ...

 Three quarantines in the Zilla Parishad | जिल्हा परिषदेतील तिघे क्वॉरंटाईन

जिल्हा परिषदेतील तिघे क्वॉरंटाईन

googlenewsNext

जळगाव : जिल्हा परिषदेत एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेत मंगळवारी अधिकाऱ्यांची तपासणी करण्यात आली. मात्र कुणालाही काही लक्षणे नव्हती. दरम्यान, पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या वरिष्ठ अधिकाºयांच्या अति जोखमीच्या संपर्कातील ७ ते ८ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. यात जिल्हा परिषदेतील तिघांचा समावेश असल्याची माहिती आहे.
जिल्हा परिषदेच्या एका वरिष्ठ अधिकाºयांचा कोरोना तपासणी अहवाल सोमवारी रात्री प्राप्त झाला अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा धक्का बसला. दुसºया दिवशी जिल्हा परिषदेत खळबळ उडाली होती.
महापालिकेकडून जिल्हा परिषदेच्या आवारात मंगळवारी औषध फवारणी करण्यात आली. त्याचबरोबर आरोग्य विभागाकडून लागलीच अधिकाºयांची तपासणी करण्यात आली. अधिकाºयांच्या क्वॉरंटाईनबाबत प्रशासनाकडून निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.

लक्षणे नाही
पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या वरिष्ठ अधिकाºयांना कसलीही लक्षणे नाही. हे अधिकारी दोन दिवसांपूर्वी अमळनेर, अडावद येथे गेले होते, मात्र इतक्या लवकर लागण होऊ शकत नाही. त्यामुळे नेमका संसर्ग कोठे झाला याची माहिती घेतली जात आहे.

त्या बैठकीत सुरक्षित अंतर
अधिकारी एका बैठकीत अन्य अधिकाºयांसोबत उपस्थित होते. मात्र या बैठकीला सुरक्षित अंतर पाळले गेले होते, शिवाय टेबलवर प्रत्येकांसमोर सॅनिटायझर ठेवण्यात आले होते, प्रत्येकाने मास्क लावला होते. त्यामुळे अधिकारी हायरीस्क कॉण्टॅक्टमध्ये येत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title:  Three quarantines in the Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.