पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथे सेवानिवृत्त सैनिकांचे जल्लोशात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 03:44 PM2019-08-03T15:44:37+5:302019-08-03T15:45:12+5:30

नांद्रा येथील रहिवासी असलेले भारतीय सैन्य दलातील तीन जवान आपल्या १७ वर्षांच्या सेवेतून सेवानिवृत्त होऊन २ रोजी नांद्रा येथे पोहचले. बसस्थानकापासून तर ते महादेव मंदिरापर्यत मिरवणूक काढण्यात आली.

Three retired soldiers receive a warm welcome at Nandra in Pachora taluka | पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथे सेवानिवृत्त सैनिकांचे जल्लोशात स्वागत

पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथे सेवानिवृत्त सैनिकांचे जल्लोशात स्वागत

Next

सामनेर, ता.पाचोरा, जि.जळगाव : नांद्रा येथील रहिवासी असलेले भारतीय सैन्य दलातील तीन जवान आपल्या १७ वर्षांच्या सेवेतून सेवानिवृत्त होऊन २ रोजी नांद्रा येथे पोहचले. बसस्थानकापासून तर ते महादेव मंदिरापर्यत मिरवणूक काढण्यात आली. त्यात शरद बोरसे (बॉम्बे इंजीनियर, पुणे), राजीव गायकवाड (ए.एस.सी.बटालियन, बंगळुरू), तर गणेश तावडे (अटलरी सेंटर, नाशिक) यांचा समावेश आहे.
नांद्रा गावाला स्वातंत्र्य काळापासून सैनिकी ओळख आहे. तिच ओळख कायम ठेवत आजही बरीच मुले सैन्यात दाखल होत आहेत व काही आपली देशसेवा करुन सेवानिवृत होत असल्याचा आनंद गावकरी व्यक्ती करत असतात.
या तिन्ही सैनिकांचा महादेव मंदिरावर भव्य सत्कार समारंभ पार पडला. यावेळी माजी आमदार दिलीप वाघ, भाजपचे अमोल शिंदे यांच्यासह मान्यवर, नातेवाईक, ग्रामस्थमित्र मंडळी, सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.कमेटी, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक मंडळ, महिला वर्ग यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Three retired soldiers receive a warm welcome at Nandra in Pachora taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.