जळगावात चाकूने मारण्याची धमकी देत तिघांनी विद्यार्थ्यांना लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:32 PM2019-09-27T12:32:29+5:302019-09-27T12:32:36+5:30
जळगाव : हॉटेलमधून जेवण करुन परत येत असताना मेहरुण तलाव परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या यश जयंत पाटील (१९,रा.शिवराम नगर) व ...
जळगाव : हॉटेलमधून जेवण करुन परत येत असताना मेहरुण तलाव परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या यश जयंत पाटील (१९,रा.शिवराम नगर) व नरेश सदाशिव बारी (रा.नेपानगर, मध्य प्रदेश ह.मु.शिव कॉलनी) या दोन विद्यार्थ्यांना २५ ते ३० वयोगटातील तिघांनी चाकूने मारण्याची धमकी देत त्यांच्याजवळील तीन मोबाईल व दीड हजार रुपये लुटल्याची घटना बुधवारी रात्री साडे आठ वाजता घडली.
यश व त्याचा मित्र नरेश हे दोघं जण बुधवारी सायंकाळी शिरसोली रस्त्यावरील हॉटेलवर यशच्या दुचाकीने (क्र.एम.एच.१९ सी.एल. ६५९३) जेवणासाठी गेले होते. रात्री साडे आठ वाजता जेवण करुन घरी परत येत असताना जकात नाक्याजवळ मेहरुण तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गप्पा मारत असताना समोरुन तीन जण धावत आले व तुम्ही कोण? येथे कशासाठी आले असे सांगून धक्काबुक्की करुन धमकावत तुमच्या खिशात काय आहे? असे म्हणत नरेशच्या खिशातून बळजबरीने मोबाईल व पाकीट काढून घेतले. त्यानंतर यशच्या डिक्कीतील मोबाईल हिसकावला दोघांजवळील तीन मोबाईल व दीड हजार रुपये असा २८ हजार ५०० रुपयांचा ऐवज हिसकावून कोणाला सांगितले तर चाकूने मारुन टाकेल, अशी धमकी देत ज्या मार्गाने आले त्याच मार्गाने हे चोरटे निघून गेले.
घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी पुढे गेल्यावर रस्त्यावर जाणाºया लोकांना झालेल्या प्रकाराची माहिती दिली. या सर्वांनी संशयितांचा मेहरुण तलाव परिसरत शोध घेतला, मात्र ते आढळून आले नाहीत. त्यानंतर यश याने घरी वडील जयंत नीळकंठ पाटील, मित्र प्रसाद पाठक, आशिष जाधव व नरेशचे मेहुणे लतीश सुभाष बारी यांना घटनेची माहिती दिली. या सर्वांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून निरीक्षक रणजित शिरसाठ यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर अज्ञात तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक फौजदार अतुल वंजारी करीत आहेत.