पोहण्याासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू
By admin | Published: May 1, 2017 10:26 PM2017-05-01T22:26:41+5:302017-05-01T22:26:41+5:30
एंरडोलनजीक अंजनी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या चारपैकी तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला.
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 1 - एरंडोलनजीक अंजनी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या चारपैकी तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सांयकाळी साडेपाच वाजता घडली. मृतांमध्ये दोन भावांचा समावेश आहे. सिद्धिकेश विवेकानंद ठाकूर (15), रोहित विवेकानंद ठाकूर (13, रा.नारायण नगर, एरंडोल ) आणि आकाश सुभाष चौधरी (14, रा. खोलगल्ली एंरडोल ) अशी या मृत झालेल्या मुलांची नावे आहेत.
तीन जणांसह शाम संजय महाजन असे चारही जण एकाच बाईकनं अंजनी धरणाजवळ गेले होते. त्यानंतर शाम सोडल्यास इतर जण पोहण्यासाठी पाण्यात उतरले. पोहता येत नसल्याने शाम हा धरणाच्या भिंतीवर बसला होता. तीनही जण बुडल्याचे लक्षात येताच शामने घराकडे धूम ठोकली आणि घटनेची माहिती दिली. ही मुले एंरडोल येथील आर. टी. काबरे विद्यालयाचे विद्यार्थी होते. या मुलांचे पालक मजुरी करतात.