गोळीबार प्रकरणातील तिघांची कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:07 AM2021-08-02T04:07:39+5:302021-08-02T04:07:39+5:30

जळगाव : उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात अटकेत असलेला मुख्य संशयित महेंद्र पांडूरंग राजपूत, त्याचा भाऊ उमेश ...

Three sent to jail in shooting case | गोळीबार प्रकरणातील तिघांची कारागृहात रवानगी

गोळीबार प्रकरणातील तिघांची कारागृहात रवानगी

Next

जळगाव : उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात अटकेत असलेला मुख्य संशयित महेंद्र पांडूरंग राजपूत, त्याचा भाऊ उमेश व किरण शरद राजपूत (तिघे रा.मयुर कॉलनी, जळगाव) या तिघांची रविवारी न्यायालयाने कारागृहात रवानगी केली. या गुन्ह्यातील जुगल बागुल व भूषण बिऱ्हाडे दोन जण फरार आहेत. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने तपासाधिकारी संदीप परदेशी यांनी तिघांना कारागृहात हजर केले.

सहायक फौजदार वासुदेव सोनवणे सेवानिवृत्त (फोटो ३३)

जळगाव : शहर पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार वासुदेव लक्ष्मण सोनवणे हे ३८ वर्षाच्या सेवेनंतर ३१ जुलै रोजी पोलीस दलातून निवृत्त झाले. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्याहस्ते सत्कार करुन त्यांना निरोप देण्यात आला. सायंकाळी शहर पोलीस ठाण्यातही छोटीखानी मिरवणूक काढून त्यांचा सत्कार करण्यात आला. सोनवणे यांनी एलसीबी, जिल्हा पेठ, पारोळा व अमळनेर येथे सेवा बजावली आहे.

जानकीबाई बाहेती हायस्कूल (फोटो ३५जळगाव : महाबळमधील श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल येथे रविवारी लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती व क्रीडा एज्युकेशन संस्थेचे संस्थापक ॲड.स्व.बबन बाहेती यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक पी.आर.जाधव यांनी प्रतिमा पूजन केले. यावेळी शिक्षक एन.एन.चौधरी, सरला चौधरी, सुनीता महाजन, टी.एस.माळी, पी.एम.पवार, के.एच.पाटील, डी.जी.पाटील, ए.एल.बोरोले, आनंद महांगडे व चंद्रकांत वाघ उपस्थित होते.

Web Title: Three sent to jail in shooting case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.