दहिगावच्या तरुणाला चार महिन्यात तीन वेळा सर्पदंश
By Admin | Published: May 12, 2017 05:15 PM2017-05-12T17:15:08+5:302017-05-12T17:15:08+5:30
तिन्ही वेळा झाला सकाळच्या वेळी सर्पदंश
दहिगाव, ता.यावल,दि.12- साप आणि मानवातील वैर आणि त्यातून नाग व नागिणकडून घेण्यात येणारा बदला चित्रपटात अनेक वेळा पहायला मिळाला आहे. मात्र यावल तालुक्यातील दहिगाव येथील गणेश मिस्त्री या तरुणाला चार महिन्यात चक्क तीन वेळा सर्पदंश झाला आहे. विशेष म्हणजे तिन्ही वेळा सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास एकाच सापाने आपल्या चावा घेतल्याचा दावा गणेशने केला आहे.
दहिगावातील गणेश देवीदास मिस्त्री (वय 40) या कारागिर युवकास चार महिन्यापूर्वी शौचास बसला असता त्याच्या पायाला व कमरेखाली सापाने चावा घेतला होता. त्यावेळी त्याच्यावर यावल ग्रामीण रुग्णालय व जळगाव सामान्य रुग्णालयात तीन दिवस उपचार करीत नंतर डिस्चार्ज देण्यात आला होता. 17 रोजी सकाळी साडे आठ वाजता दुसरी घटना झाली होती. तर शुक्रवार 12 मे रोजी घराच्या पाठी मागील भागात भोकर झाडाच्या जवळील काडी कचरा, पाटय़ा उचलत असताना सापाने त्याच्या डाव्या हाताच्या मनगटाला चावा घेतला. साप दोन ते तीन फूट लांबीचा असावा असा अंदाज आहे. मिस्त्रीना तीन वेळा ही सकाळी एकाच वेळी साडे आठ वाजेच्या दरम्यान सापाने चावा घेतला हे विशेष असल्याचे आश्चर्य होत आहे. याच इसमास तीन वेळा साप चावा घेतो म्हणजे नागिन चित्रपटाची पुनरावृत्ती तर नाही ना? असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.