पाचोरा शहरात स्वच्छतेचे तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 04:19 PM2019-05-29T16:19:32+5:302019-05-29T16:19:39+5:30
सर्वत्र घाणीचे साम्राज्य : हगणदरीमुक्तीचाही बोजवारा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
पाचोरा : शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून हगणदारीमुक्तीचा बोजवारा झाला आहे. यामुळे अनेक भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शहरात बऱ्याच ठिकाणी कचºयाचे ढीग पहायला मिळत आहे.'स्वच्छ शहर सुंदर शहर' ही संकल्पना जाहिरातीपुरतीच सिमीत असून पालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.'स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९' कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.
पाचोरा शहराची भौगोलिक स्थिती पाहता साधारण ४ कि. मी. च्या परिसरात पालिकेचे क्षेत्र आहे. १३ प्रभाग असून २६ नगरसेवक आहेत. नवीन वस्ती कॉलनी भाग झपाट्याने वाढत आहे. पालिकेतर्फे शहर स्वच्छतेचा ठेका दिला आहे. शहरात भूमिगत गटारीचे काम सुरू आहे. मात्र आहे त्या गटारी तुडुंब भरल्या असून ठिकठिकाणी कचºयाचे ढीग, प्लॅस्टिक, सांडपाण्याचे डबके, कोंबड्या, बकऱ्यांच्या मांसाचे तुकडे, छाटलेले पंख, गटारीतील काढलेली घाण भर रस्त्यावर जागोजागी पडलेली आहे. मात्र नगरपालिका आरोग्य विभाग सुस्त असून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यास पालिका प्रशासन, सत्ताधाºयांची मानसिकता दिसून येत नाही. पाचोरा शहरात स्वच्छ केवळ नावालाच 'सर्व्हेक्षण २०१८' राबविले, लाखो रुपये जाहिराती व स्वच्छतेसाठी खर्ची घातले असतानाही शहरात घाणीचे साम्राज्यच पाहायला मिळत आहे.
प्लॅस्टीक कॅरीबॅगचा
सर्रास होतोय वापर
पर्यावरणाच्या दृष्टीने राज्य सरकारने राज्यात प्लॅस्टिक वापरावर बंदी घातली आहे. प्लॅस्टिक विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद असताना नगरपालिकेच्या संबंधित विभागाकडून ता आदेशाची पायमल्लीच होत असून एक-दोन थातुरमातुर कारवाया करून प्लॅस्टिक विक्रेत्यांवर आता हेतुपुरसार मेहेरबानी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. शहरात प्लॅस्टिकचा राजरोसपणे वापर सुरू असून प्रत्येक दुकानदार भाजी व फळ विक्रेत्यांकडे प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग उपलब्ध असून ग्राहकांना त्या दिल्या जात आहे. यामुळे शहरात कॅरीबॅगचा खच कचºयात आढळून येतो. गटारी नाले यात प्लॅस्टिक अडकलेले दिसते. मंगल कार्यालयात समारंभातही प्लॅस्टिकच्या वस्तूचा वापर होत असून यावर पालिकेचे नियंत्रण नाही.
हगणदारीमुक्ती ‘फेल’
शासनाने हगणदरीमुक्तीचे आदेश काढून कोट्यवधीचा निधी पालिकेला दिला. शहरात घरोघरी शौचालय मंजूर करून प्रत्येकी १५ हजाराचे अनुदान दिले. सार्वजनिक शौचालय ‘पे अँड युज’ तत्वावर १० युनिट बांधले. मात्र उघड्यावर शौच करण्याचे प्रकार थांबले नाहीत.
स्वच्छ सर्व्हेक्षण मोहिमेत बक्षीस मिळण्याच्या आशेने पालिकेचे गुडमॉर्निंग पथक काही दिवस चालले मात्र उपयोग झाला नाही. लोकांची मानसिकता शौचालय वापर करण्याची नसल्याचे दिसून येते. मात्र अशांवर कडक कारवाई झाली नाही. शहरातील गटारी तुडुंब भरलेल्या असून नालेसफाई होताना दिसत नाही. यामुळे गटाराचे पाणी ओहरफ्लो होऊन रस्त्यावर येते, घाणीची दुगंर्धी, गटारीतील काढलेली घाण रस्त्यावरच असते. याकडेही पालिकेचे लक्ष नाही. यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. गटारी ओसंडून वाहतात तरीही साफसफाई होत नाही.