कारागृहातील तिघांना पळवून नेणाºयाच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 09:09 PM2020-08-24T21:09:17+5:302020-08-24T21:09:38+5:30

जळगाव : कारागृहातून पलायन केलेल्या तीन जणांना दुचाकीवर बसवून पळून जाण्यास मदत करणाºया जगदीश पुंडलिक पाटील (१८, रा.पिंपळकोठा, ता.पारोळा) ...

The three who escaped from the prison smiled | कारागृहातील तिघांना पळवून नेणाºयाच्या मुसक्या आवळल्या

कारागृहातील तिघांना पळवून नेणाºयाच्या मुसक्या आवळल्या

Next

जळगाव : कारागृहातून पलायन केलेल्या तीन जणांना दुचाकीवर बसवून पळून जाण्यास मदत करणाºया जगदीश पुंडलिक पाटील (१८, रा.पिंपळकोठा, ता.पारोळा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री पकडले. सुरतला जात असतानाच ट्रॅव्हल्स बसमध्ये पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. दरम्यान, यातील तीनही संशयित फरार असून ते देखील लवकरच हाती लागतील, अशा आशा आता पोलिसांच्या बळावल्या आहेत.
गेल्या महिन्यात २५ जुलै रोजी गेट किपर म्हणून ड्युटीला असलेल्या कारागृह रक्षक पंडीत दामु गुंडाळे (४७) यांच्या डोक्याला गावठी पिस्तुल लावून सुशील अशोक मगरे (३२,रा.कसबे पहूर, ता.जामनेर),गौरव विजय पाटील (२१, रा.तांबापुरा,अमळनेर) व सागर संजय पाटील (२२,पैलाड,अमळनेर) या तीन न्यायालयीन बंदींनी कारागृहातून फिल्मीस्टाईल पलायन केल्याची घटना घडली होती. या तिघांना घेण्यासाठी बाहेर जगदीश पाटील हा दुचाकीवर थांबलेला होता.त्याच्यासोबत एकाच दुचाकीवर हे चौघे जण पळून गेले होते.

दुचाकीही निघाली चोरीची
या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देखील चोरीचीच असल्याचे निष्पन्न झाले आहे. कारागृहातून बाहेर आल्यावर सर्व जण नंदूरबार येथे गेले. तेथून सुशील मगरे व गौरव पाटील दोघं जण सोबत तर सागर पाटील व जगदीश पाटील हे दोघं जण सोबत परंतु वेगवेगळ्या दिशेने गेले होते, अशी माहिती जगदीश याने तपासात पोलिसांना दिली आहे. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम या तिघांनी जगदीश याची स्वतंत्ररित्या चौकशी केली.सागर व गौरव या दोघांनी देखील कारागृहातून पलायन केल्यानंतर अमळनेरात येऊन दुचाकी चोरी केल्याचे प्रकरण उघड झाले आहे.

सुरतला जाण्यासाठी पारोळ्यातून बसला
जगदीश हा रविवारी रात्री सुरतला जाण्यासाठी एका ट्रॅव्हल्स बसमध्ये बसला होता. ही माहिती पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांना मिळाल्यानंतर त्यांनी धुळे, साक्री येथील पोलिसांशी संपर्क साधून बसची माहिती दिली तर एक पथक बसच्या मागे रवाना केले. साक्रीजवळ बस अडवून जगदीश याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, सागर पाटील हा सुरतमध्ये असल्याचा संशय असून त्याच्याच भेटीला जगदीश जात असल्याची शक्यता आहे.

Web Title: The three who escaped from the prison smiled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.