चोपड्यात तीन महिलांचा आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 10:08 PM2018-05-02T22:08:06+5:302018-05-02T22:08:06+5:30
सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण काढले जात नसल्याच्या निषेधार्थ गरताड, ता.चोपडा येथील तीन महिलांनी बुधवारी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिघींना हा प्रयत्न हाणून पाडला.
आॅनलाईन लोकमत
चोपडा, दि. २ : सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण काढले जात नसल्याच्या निषेधार्थ गरताड, ता.चोपडा येथील तीन महिलांनी बुधवारी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिघींना हा प्रयत्न हाणून पाडला.
गरताड येथे घर क्रमांक ९१ चे बांधकाम हे अतिक्रमणात सुरू आहे. ते थांबवावे या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलन केले. मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले, असा मंगलाबाई पाटील, मीराबाई पाटील, पुष्पाबाई पाटील या तीन महिलांचा आरोप आहे. कारवाई होत नसल्याने अखेर या तीन महिलांनी २ रोजी दुपारी साडेबाराला तहसील कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्यासाठी आल्या. तेव्हा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किसनराव नजनपाटील व सहकाऱ्यांनी महिलांचा आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडला. रॉकेलचे डबे हिसकावल्यानंतर बाचाबाची झाली. यादरम्यान तहसीलदार दीपक गिरासे यांनी या महिलांना चर्चेसाठी बोलविले. प्रांताधिकारी संजय गायकवाड यांनी मध्यस्थी केली.
गटविकास अधिकारी डॉ.अशोक दांडगे यांनी लगेच गरताड येथील सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांच्या बरखास्तीचा प्रस्ताव जळगाव जि.प.मध्ये मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे पाठवितो, असे सांगितले व अतिक्रमण असल्यास काढण्यात येईल, असे लेखी पत्र देण्याच्या अटीवर आत्मदहन करण्याचा निर्णय मागे घेण्यात आले.