महिलेच्या विनयभंग प्रकरणी तीन वर्ष कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 10:09 PM2019-11-26T22:09:58+5:302019-11-26T22:10:12+5:30

जळगाव : घरात घुसून महिलेशी अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी राजेंद्र उर्फ पिंटू बसराज राठोड (रा.लहान बोढरे, ता. चाळीसगाव) याला न्यायालयाने ...

Three years imprisonment for violation of woman | महिलेच्या विनयभंग प्रकरणी तीन वर्ष कारावास

महिलेच्या विनयभंग प्रकरणी तीन वर्ष कारावास

Next

जळगाव : घरात घुसून महिलेशी अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी राजेंद्र उर्फ पिंटू बसराज राठोड (रा.लहान बोढरे, ता. चाळीसगाव) याला न्यायालयाने तीन वर्ष सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जे.कटारिया यांनी मंगळवारी हा निकाल दिला.
राजेंद्र राठोड याने ८ जून २०१४ रोजी सायंकाळी पाच वाजता पीडित महिला शेणाने अंगण सारत असताना तिच्या घरात जावून अश्लिल वर्तन केले होते.त्यास प्रतिकार केला असता त्याने पीडितेला लाथाबुक्यांनी मारहाण केली होती. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव पोलीस स्टेशनला विनयभंग व अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड व निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी केला होता.
जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जे.कटारिया यांच्या न्यायालयात हा खटला चालला. त्यात पीडिता, तपासाधिकारी यांच्यासह आठ साक्षीदार तपासण्यात आले. पुरावा व सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने राजेंद्र राठोड याला ३५४ अ कलमाखाली १ वर्ष कारावास व ५०० रुपये दंड, ३५४ ब कलमाखाली ३ वर्ष सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड व ३२३ नुसार ६ महिने सश्रम कारावास व २०० रुपये दंड तर अ‍ॅट्रासिटीच्या कलमाखाली १ वर्ष सश्रम कारवास व ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकारतर्फे अ‍ॅड.संभाजी पाटील, अ‍ॅड.चारुलता बोरसे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी सहायक फौजदार शालीग्राम पाटील व केस वॉच दिलीप सत्रे यांनी सहकार्य केले.

Web Title: Three years imprisonment for violation of woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.