तीन वर्षे उलटले, आठपट रक्कम तर दूरच; मुद्दल सात लाखही गेले, महिलेची फसवणूक

By विजय.सैतवाल | Published: September 19, 2023 05:28 PM2023-09-19T17:28:02+5:302023-09-19T17:28:46+5:30

ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे लाखो रुपयांमध्ये फसवणुकीचे प्रकार वाढत असून आता पुन्हा एका महिलेचीदेखील फसवणूक करण्यात आली.

Three years passed, eight times the amount far away; Principal seven lakhs also gone, fraud of the woman | तीन वर्षे उलटले, आठपट रक्कम तर दूरच; मुद्दल सात लाखही गेले, महिलेची फसवणूक

तीन वर्षे उलटले, आठपट रक्कम तर दूरच; मुद्दल सात लाखही गेले, महिलेची फसवणूक

googlenewsNext

जळगाव : योजनेत आयडी तयार करून दोन वर्षांत आठपट रक्कम देण्याचे आमिष दाखवत सुवर्णा संभाजी पवार (४५, रा. कुंभारवाडा, पिंप्राळा, जळगाव) या महिलेची सात लाख १० हजार ५२८ रुपयांमध्ये सुरत येथील तिघांनी फसवणूक केली. गुंतवणूक केल्यानंतर दोन वर्षांत आठपट रक्कम देण्याचे सांगितले; मात्र आता तीन वर्षे उलटले तरीदेखील वाढीव रक्कम मिळाली तर नाहीच उलट मुद्दलही हातचे गेल्याने या महिलेने रामानंद नगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे लाखो रुपयांमध्ये फसवणुकीचे प्रकार वाढत असून आता पुन्हा एका महिलेचीदेखील फसवणूक करण्यात आली. पिंप्राळा परिसरातील सुवर्णा पवार या गृहिणीशी सुरत येथील केवीन ब्रम्ह भंटट, जिग्ना, जनकभाई (पूर्ण नाव समजू शकले नाही) या तीन जणांनी संपर्क साधत त्यांना एका योजनेत आयडी तयार करुन त्यात पैसे भरण्यास सांगितले. जेवढी रक्कम भरली त्याच्या आठपट रक्कम दोन वर्षांत दिली जाईल, असेही त्या महिलेला सांगण्यात आले. त्यानुसार या महिलेने १ जुलै २०२० ते ३१ जुलै २०२० या दरम्यान वेगवेगळ्या आयडीवर रक्कम भरली.

बोली केलेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी अर्थात तीन वर्षे झाली तरी या महिलेला भरलेल्या रकमेच्या आठपट रक्कम मिळाली तर नाहीच उलट मुद्दल सात लाख १० हजार ५२८ रुपयेदेखील हातचे गेले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सदर महिलेने रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वरील प्रकारे नावे सांगण्याऱ्या तिघांविरुद्ध १८ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील करीत आहेत.

Web Title: Three years passed, eight times the amount far away; Principal seven lakhs also gone, fraud of the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव