उंबरठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2017 12:51 PM2017-05-22T12:51:51+5:302017-05-22T12:51:51+5:30

वीकेण्ड स्पेशलमध्ये जयंत पाटील यांनी पत्र या सदरात केलेले लिखाण.

Threshold | उंबरठा

उंबरठा

Next
>प्रिय केतु, सप्रेम आठवण
अखेर तुमची लगनघटीका एक एक पाऊलांनी जवळ जवळ येत आहे. माङया आणि आईच्या मनात तर सनईची मंगलधून गेल्या वर्षभरापासूनच मुक्कामास आली आहे. इकडच्या स्वागतसोहळ्याचे निमंत्रण आणि त्या सोबतचे माङो हृद्गत यांचे कौतुक करणारे खूप फोन येत आहे. एकदोन सूचना तर अशा आल्या की, ते पत्र डीटीपी करून लगAमंडपाच्या प्रवेशद्वारी लावावे. केतु, माङो शब्द ते काय? मी मात्र विलक्षण संकोचून गेलो आहे खरा.. जी केतु आमच्या घरी गृहलक्ष्मी बनून यायला निघाली आहे, त्या आनंदानेच हे पत्र माङयाकडून लिहून घेतले आहे. ‘मी तो केवळ भारवाही’ तुङया स्वागतास काही उणेपणा आला तर मात्र तुङया या आई-बाबांना आपल्या पोटात सामावून घे.. उताराला लागलेल्या आम्ही आमच्यातली प्रकाशाच्या दिव्याची वात थोडी पुढे सरकवली आहे इतकेच.. आमच्या उत्साहाचा अर्थ इतकाच आहे.
निसर्गाने माङया स्वभावात एक उमनराईज पोटेन्शियल हलकेच मिसळले आहे. शरदबाबुंच्या ‘यक्षप्रश्न’ या कादंबरीत कमल हे पात्र आहे. मुद्दल गमावून व्याजाची फिकीर न करणारी उदारमनस्क अशी आहे कमल. माङया पिंडधर्माला ती स्पर्श करते. मला लाख काय आणि कोटी काय यात काही फरक आहे असे वाटतच नाही. इकडची प्रत्येक कृती तुङया आनंदाशी जोडलेली आहे. काल 16 जानेवारीला हळदीची पंगत झाली. वरण-पोळी-गुळाचा शिरा-वांग्याची घोटलेली भाजी आणि कढी. येथे एक अनाथ बालकाश्रम आहे. 50-55 मुले आहेत. स्वयंपाकी आपल्या आसोद्याचा माझा शाळासोबतीच आहे. त्याने सकाळच्या 10 वाजेर्पयत जेवण तयार ठेवले. ती मुले 10ला जेवतात. त्यांच्यासाठी व्यवस्था केली. 
केतु, आज आम्ही कोल्हापूरी निघत आहोत. अनेक अडथळे पार करीत अखेर आम्ही आमच्या सुनेला घेऊन यायला निघालो आहोत. जगाच्या रंगमंचावर दोन घरे (रेमणे-पाटील) कायमची जोडली जाणार आहेत. नव्या नात्यांच्या भूमिका वठवणार आहेत. आणि आम्ही आमच्या सुनेला घेऊन यायला निघालो आहोत..
तुमच्या प्रेमनिधान लाभलेल्या घराचा उंबरठा याचकाला किंवा एखाद्या अनामिक पाहूण्याच्या स्वागताला कधीही उणा पडू देऊ नका बाळांनो. (आमचा वावर त्या उंबरठय़ाच्या आसपासच असणार आहे हे तुम्हाला माहित आहे नां?) तुम्हाला समृद्ध संवेदनक्षम सहजीवन लाभावे अशा आईच्या नी माङया आशिर्वादात्मक शुभेच्छा.
 
तुङो आई-बाबा.
 

Web Title: Threshold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.